चन्नी झुकेगा नही! पंजाब निवडणुकीतही 'पुष्पा' चा फिवर

पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी 2022 रोजी विधानसभेच्या 117 जागांसाठी मतदान होणार आहे.
Charanjit Channi
Charanjit ChanniSakal
Updated on

Punjab Assembly Election 2022: सध्या देशभरात गाजत असलेल्या पुष्पा (Pushpa) चित्रपटाचा फिवर पंजाब विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील दिसून येत आहे. शनिवारी काँग्रेसने याबाबत विद्यमान मुख्यमंत्री चन्नी (Punjab CM Charanjit Channi) यांचे एक पोस्टर (Poster) जारी केले असून सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये, ईडीचा छापा मारा किंवा खोटे आरोप करा... चन्नी झुकेगा नही! हा पंजाबचा सिंह आहे, अशा आशयाचा मजकूर या पोस्टरवर प्रकाशित करण्यात आला आहे. याशिवाय साड्डा चन्नी-साड्डा मुख्यमंत्री या थीमवर अनेक ठिकाणी प्रचार सामग्री देखील बनवण्यास सुरुवात झाली आहे. (Punjab Assembly Election Latest News In Marathi )

Charanjit Channi
रूको जरा! 'हिंदुस्थानी भाऊ' ला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी

पंजाबमध्ये 20 फेब्रुवारी 2022 रोजी विधानसभेच्या 117 जागांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदासाठी विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचे नाव आघाडीवर आहे. रविवारी (दि. 6) राहुल गांधी (Rahul Gandhi) पंजाबच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराच्या नावाची औपचारिक घोषणा करण्याची शक्यात आहे. त्यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या या पोस्टरमुळे चन्नी यांना पुन्हा संधी मिळणार का? या बद्दलची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()