Punjab Election : राम रहीम तुरुंगाबाहेर, फायदा नेमका कुणाला?

निवडणुकीपूर्वी रहीमला फर्लो मंजूर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Ram Rahim Latest News
Ram Rahim Latest NewsSakal
Updated on

चंदीगड : बलात्कार आणि हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम गुरमीत सिंग याला सोमवारी 21 दिवसांचा फर्लो मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, येत्या 20 फेब्रुवारी रोजी पंजाबमध्ये विधानसभेच्या 117 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी रहीमला फर्लो मंजूर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, आज आपण पंजाबच्या राजकारणात डेरा सच्चा सौदाची भूमिका कशी आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. (Ram Rahim Latest News)

Ram Rahim Latest News
iphone ची आयडीया! तोंडावर मास्क असतानाही होणार अनलॉक

बीबीसी हिंदीच्या रिपोर्टनुसार, हरियाणात पार पडलेल्या 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयातही डेरा सच्चा सौदाने मोठी भूमिका निभावली होती. यापूर्वी देखील भाजपने डेराला पूर्ण पाठिंबा दिला होता, असे असे या सर्वाची माहिती असलेल्या प्रोफेसर खालिद यांचे मत आहे. पंजाबमध्ये सर्वाधिक प्रभाव असलेल्या डेरांमध्ये डेरा सच्चा सौदा, राधा स्वामी सत्संग, डेरा नूरमहल, डेरा निरंकारी, डेरा सचखंड बल्लान आणि डेरा नामधारी यांचा समावेश आहे. हे डेरे पंजाबमधील एकूण 117 जागांपैकी 56 जागांवरील निकालांवर प्रभाव टाकू शकतात, असे चंदीगड-आधारित इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट अँड कम्युनिकेशनने केलेल्या संशोधनात म्हटले आहे.

Ram Rahim Latest News
‘चरणजित सिंग चन्नी हे पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री असतील’

2007 मध्ये डेराचा काँग्रेसला पाठिंबा

राज्यात निवडणुका जवळ आल्यावर, राजकीय पक्षांच्या नेत्यामध्ये या डेरांकडून पाठिंबा मिळवण्यासाठी स्पर्धा लागते. दरम्यान, पंजाबमध्ये 2007 च्या विधानसभा निवडणुकीवेळी, डेरा सच्चा सौदाने त्यांच्या अनुयायांना काँग्रेसला मतदान करण्याची सूचना केली होती. याचा परिणाम अकाली दलाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अनेक ठिकाणांवर शिरोमणी अकाली दलाचे उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, असे असतानाही शिरोमणी अकाली दलाने भाजपसोबत एकत्र येत पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाले आणि यानंतर डेरा सच्चा सौदासोबतचे त्यांचे संबंध बिघडले. 2007 च्या निवडणुकीत अकाली दलाला 48 तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या.

Ram Rahim Latest News
सरकारच्या धोरणांमुळे देशातील तरूणांची ताकद वाढली : मोदी

2012 मध्ये कॅप्टनने घेतील होती रहीमची भेट

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी 2012 च्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत डेरा सच्चा सौदाचा पाठिंबा मिळवण्यासाठी गुरमीत राम रहीम याची भेट घेतली होती. पण या वर्षी डेराने कोणत्याही पक्षाला उघडपणे त्यांचा पाठिंबा जाहीर केला नव्हता. यामागे डेराला अकाली दलाशी बिघडलेले संबंध सुधारायचे होते, म्हणून त्यांनी अकाली उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. दरम्यान, या निवडणुकीत अकाली दलाने मागील निवडणुकांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करत 56 जागा जिंकल्या होत्या.

Ram Rahim Latest News
"लता मंगेशकरांनी संपूर्ण देशाला एकत्र आणलं"; मोदींनी वाहिली लोकसभेत श्रद्धांजली

2017 मध्ये अकालीला पाठिंबा

दोन वर्षांनंतर म्हणजेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, डेरा सच्चा सौदाने भटिंडा येथून अकाली दलाच्या उमेदवार हरसिमरत कौर बादल यांचा विजय सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याशिवाय 2014 मध्येच डेरा सच्चा सौदाने हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देत त्यांच्या विजयातही मोठी भूमिका बजावली होती. एवढेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान सिरसा येथील सभेत गुरमीत राम रहीम याचा सन्मान देखील केला होता. 2017 च्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीतही डेरा सच्चा सौदाने अकाली दलाला पाठिंबा दिला होता. परंतु, त्यानंतरही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र, यामध्ये पक्षाला 25 टक्के मते स्वतःकडे वळविण्यात यश मिळाले होते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()