KPI green energy : केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या (KPI Green Energy) संचालक मंडळाची उद्या अर्थात 14 नोव्हेंबरला बैठक होणार आहे. या बैठकीत शेअरहोल्डर्सना बोनस देण्याबाबत विचार केला जाईल. बोनस शेअर्स देण्याच्या प्रस्तावावर कंपनी विचार करण्याची या वर्षातील ही दुसरी वेळ असेल.