Electric Vehicle खरेदीची सुवर्ण संधी! दुचाकीवर मिळणार 'इतकी' सबसिडी, जाणून घ्या नव्या योजनेविषयी सर्वकाही

Electric Vehicle: देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) वापरास प्रोत्सहान आणि गती देण्यासाठी, अवजड उद्योग मंत्रालयाने 500 कोटी रुपयांची इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट प्रमोशन स्कीम 2024 (EMPS 2024) सुरू केली आहे.
New Scheme For Electric Vehicles Subsidy
New Scheme For Electric Vehicles SubsidyEsakal
Updated on

Subsidy On Electric Vehicle:

भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून 500 कोटी रुपयांची नवीन योजना लागू होत आहे. ही योजना जुलै अखेरपर्यंत सुरू राहणार आहे.

दरम्यान, FAME, किंवा फास्टर ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया (FAME-II) कार्यक्रमाचा दुसरा टप्पा 31 मार्च 2024 रोजी संपला आहे. FAME योजनेंतर्गत 31 मार्चपर्यंत किंवा निधी उपलब्ध होईपर्यंत विक्री केलेल्या ई-वाहनांसाठी सबसिडी असणार आहे.

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) वापरास प्रोत्सहान आणि गती देण्यासाठी, अवजड उद्योग मंत्रालयाने 500 कोटी रुपयांची इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट प्रमोशन स्कीम 2024 (EMPS 2024) सुरू केली आहे.

EMPS 2024 अंतर्गत, प्रति दुचाकी 10,000 रुपयांपर्यंतची सबसिडी दिली जाईल. या योजनेद्वारे अंदाजे 3.33 लाख दुचाकी वाहनांना सबसिडी देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

41,000 हून अधिक छोट्या तीन-चाकी वाहनांच्या (ई-रिक्षा आणि ई-कार्ट) खरेदीसाठी 25,000 रुपयांपर्यंतची सबसिडी या योजनेद्वारे दिली जाणार आहे. तर, मोठ्या तीनचाकी वाहनांना 50,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळेल.

New Scheme For Electric Vehicles Subsidy
AI : घरबसल्या मिळवा हक्काच्या योजनांचा लाभ, आता AI देणार सरकारी योजनांची माहिती

अवजड उद्योग मंत्रालयाने 13 मार्च रोजी देशातील हरित वाहतूक व्यवस्था आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मिती परिसंस्थेच्या विकासाला गती देण्यासाठी या योजनेची घोषणा केली होती.

या योजनेद्वारे सुमारे 3,72,215 इलेक्ट्रिक वाहनांना अर्थसहाय्य देण्याचे उद्दिष्ट आहे. मंत्रालयाने म्हटले होते की, प्रगत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी, प्रगत बॅटरी बसवलेल्या वाहनांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याचीही अपेक्षा आहे.

New Scheme For Electric Vehicles Subsidy
Loan Apps: ऑनलाइन कर्ज देणाऱ्या बेकायदेशीर ॲप्सना रोखण्यासाठी आरबीआय उचलणार 'हे' मोठे पाऊल

सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाचा एक भाग म्हणून, EMPS 2024 देशातील कार्यक्षम, स्पर्धात्मक आणि लवचिक EV उत्पादन उद्योगाला प्रोत्साहन देईल. या उद्देशासाठी, फेज्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्रामचा अवलंब केला गेला आहे. यातून देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल आणि EV पुरवठा साखळी मजबूत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.