भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित क्षेत्रात काम करत असलेल्या नोकरदारांची येत्या काही काळात चांदी होणार आहे.
कारण Amazon Web Services (AWS) नुकतेच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, भारतातील AI कौशल्ये आणि ज्ञान असलेल्या कर्मचाऱ्यांना 54 टक्क्यांहून अधिक पगार वाढ मिळू शकते.
Amazon ची उपकंपनी AWS ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, जवळपास 99 टक्के कंपन्या 2028 पर्यंत त्यांचे बऱ्यापैकी काम AI प्रणालीवर शिफ्ट करण्याच्या योजना आखत आहेत.
अहवालात म्हटले आहे की, ९७ टक्के कंपन्यांना विश्वास आहे की, त्यांच्या वित्त विभागाला याचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे. त्यानंतर आयटी (९६ टक्के), संशोधन आणि विकास (९६ टक्के), विक्री आणि विपणन (९६ टक्के), व्यवसाय ऑपरेशन्स (९५ टक्के) मानव संसाधन (94 टक्के), आणि कायदेशीर विभाग (92 टक्के) यांना AI स्किल्सचा सर्वाधिक लाभ होणार आहे.
Accelerating AI Skills: Preparing the Asia-Pacific Workforce for the Jobs of the Future या अहवालात असे नमूद केले आहे की, जवळपास 98 टक्के कंपन्या पुढील पाच वर्षात नोकरीवर जनरेटिव्ह AI टूल्स वापरण्याची तयारी करत आहेत. भारतातील 1,600 कामगार आणि 500 कंपन्या यांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
AWS चे एक्झिक्युटिव्ह अमित मेहता म्हणाले की, त्यांच्या कंपनीने विप्रो, L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस, आयरिस सॉफ्टवेअर आणि इतर सारख्या IT प्रमुख कंपन्यांशी कर्मचाऱ्यांना AI स्किल्ड कामगार बणवण्यासाठी करार केला आहे.
एआय इंडस्ट्रीमध्ये नोकऱ्या शोधत असलेल्या लोकांसाठी आणखी एक चांगली बातमी म्हणजे एआय-कुशल कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे ही भारतातील दहापैकी नऊ पेक्षा जास्त (९६ टक्के) कंपन्याचे प्राधान्य आहे, असे AWS अहवालात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.