सुधाकर कुलकर्णी
निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक नियोजनाबाबत वाढत चाललेल्या जागरूकतेमुळे नॅशनल पेन्शन सिस्टिम अर्थात ‘एनपीएस’ योजनेतील लोकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत चालला आहे व अधिकाधिक लोकांनी या योजनेत सहभागी व्हावे म्हणून ‘पीएफआरडीए’देखील (पेन्शन फंड रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट अॅथॉरिटी) ही योजना जास्तीतजास्त ग्राहकाभिमुख व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या योजनेत वेळोवेळी बदल करून लवचिकता आणली जात आहे.