World Richest Person: बर्नार्ड अर्नाल्ट पुन्हा ठरले सर्वात श्रीमंत व्यक्ती; इलॉन मस्क यांची संपत्ती किती घटली?

Bernard Arnault World Richest Person: फ्रेन्च अब्जाधीश बर्नार्ड अर्नाल्ट यांनी इलॉन मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पुन्हा मिळवला आहे. फोर्ब्सच्या रियल टाईम बिलिनियर यादीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
Bernard Arnault World Richest Person
Bernard Arnault World Richest PersonSakal
Updated on

नवी दिल्ली- फ्रेन्च अब्जाधीश बर्नार्ड अर्नाल्ट यांनी इलॉन मस्क यांना मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान पुन्हा मिळवला आहे. फोर्ब्सच्या रियल टाईम बिलिनियर यादीमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अर्नाल्ट यांची संपत्ती २०७.८ डॉलर अब्ज इतकी झाली आहे. त्यांच्या संपत्तीत २३.६ अब्ज डॉलरची वाढ झाली. त्यामुळे त्यांनी २०४.५ अब्ज डॉलर संपत्ती असलेल्या इलॉन मस्क यांना मागे टाकले.

टेस्लाचे प्रमुख मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनीच्या शेअर्सध्ये १३ टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे त्यांना त्यांच्या एकूण संपतीत १८ अब्ज डॉलरचे नुकसान सहन करावे लागले. दुसरीकडे, लक्झरी जायंट LVMH च्या शेअर्समध्ये १३ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. भविष्यातील मोठ्या विक्रीच्या संभाव्यतेने शेअर्संच्या किंमती वाढल्या. (Bernard Arnault CEO of French luxury giant LVMH has surpassed Elon Musk as the world richest person)

Bernard Arnault World Richest Person
Vladimir Putin Net Worth : इलॉन मस्क अन् जेफ बेझोसपेक्षा श्रीमंत आहेत व्लादिमीर पुतीन? नेमकी किती आहे संपत्ती?

७४ वर्षीय अर्नाल्ट हे LVMH कंपनीचे सीईओ आहेत. त्यांनी जवळपास चार दशकांमध्ये लक्झरी वस्तूंमध्ये आपला साम्राज्य निर्माण केलं आहे. लुई व्हिटन, TAG ह्युअर आणि डोम पेरिग्नॉन असे प्रसिद्ध ब्रँड घडवले आहेत. त्यांनी आपल्या पाच मुलांना देखील व्यवसायात आणलं आहे.

Bernard Arnault World Richest Person
Tesla: इलॉन मस्क गुजरातमध्ये भारतातील पहिला कारखाना उभारणार; लवकरच घोषणा होण्याची शक्यता

एप्रिल महिन्यामध्ये LVMH ५०० अब्ज डॉलर बाजार किंमत असलेली पहिली युरोपीयन कंपनी ठरली होती. अर्नाल्ड हे डिसेंबर २०२२ मध्ये पहिल्यांदा अव्वल क्रमांकावर आले होते. LVMH ने २०२१ मध्ये Tiffany & Co. चा ताबा १६ अब्ज डॉलरमध्ये मिळवला होता. लक्झरी व्यवसायातील हा सर्वात मोठा करार होता असं सांगितलं जातं. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.