Budget 2024 : देशाचं बजेट ज्यामध्ये दडलेलं असतं ती बॅग लाल रंगाचीच का असते?

Red Colour Bag : याआधीही अनेक अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केले आहे, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे त्यांच्या बजेट दिवशी त्यांच्या हातात दिसणारी लाल रंगाची बॅग.
Budget 2024
Budget 2024esakal
Updated on

Budget 2024 :

संसदेचा अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्ट पर्यंत असणार आहे. या दरम्यान 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आपले सातवे बजेट सादर करणार आहेत. गेली अनेक वर्ष त्या बजेट सादर करत आहेत. आणि याआधीही अनेक अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केले आहे, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे त्यांच्या बजेट दिवशी त्यांच्या हातात दिसणारी लाल रंगाची बॅग.

या लाल रंगाच्या बॅगेतच आपलं बजेट दडलेलं असतं. त्यामुळे या लाल रंगाच्या पोतडीत, लाल रंगाच्या बागेत नक्की दडले तरी काय अशाच्या बातम्या ही प्रसिद्ध होतात. बजेट ठेवण्यासाठी लाल रंगाची बॅगच का निवडली जाते हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का. याचे उत्तर आज आपण जाणून घेऊ.

Budget 2024
Budget 2024: आयुष्मान भारत योजनेत मोठ्या बदलांची तयारी; विमा संरक्षण आता 5 लाखांवरुन 10 लाख होण्याची शक्यता

2019 मध्ये निर्मला सीतारामन यांनी बॅगेऐवजी लाल रंगाची डिजिटल वही सोबत नेली होती. त्यातूनच त्यांनी बजेट सादर केले. तर 2021 मध्ये त्यांनी एक टॅबलेटचा वापर केला या टॅबलेटला लाल रंगाचे कव्हर घालण्यात आले होते. भारतीय राजकारणात लाल रंगाची बॅग किंवा लाल रंग महत्त्वाचा वाटतो.

ब्रिटिशांशी जुळलेलं लाल रंगाचा कनेक्शन

असं म्हटलं जातं की 1860 मध्ये ब्रिटिश कौन्सिलर बुलेट स्टोन यांनी राणीचा मोनोग्राम असलेला लाल रंगाची चामड्याची बॅग पहिल्यांदा सादर केली होती. याला ब्लड स्टोन बॉक्स याच्या नावाने ओळखले जाते.

लाल रंगाच्या रंगामागे दोन कारण असो शकतात पहिलं हे की सॅक्स कोबर्ग गोथा यांच्या सेनेत या रंगाला अधिक महत्त्वाचे स्थान होते. तर दुसरं कारण असं सांगितलं जातं की 16 व्या शतकातील एलिजाबेथ यांनी स्पेनच्या राजदूतला एक गोड पदार्थ एका लाल रंगाच्या ब्रीफकेस मधून म्हणजे बॅगेमधून पाठवला होता. त्यामुळे लाल रंगाच्या बॉक्सेस आणि बॅगची परंपरा सुरू झाली.

Budget 2024
Budget 2024 : अर्थसंकल्पात एसटीची झोळी रिकामी; डिझेलचा सर्वात मोठा ग्राहक दुर्लक्षित, संघटनांची तीव्र नाराजी

यामुळे सुद्धा हे लाल रंगाची हवा

बजेटचा दिवस खास असतो. या दिवशी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या जातात. या दिवशी केल्या गेलेल्या घोषणा आणि राबवल्या जाणाऱ्या योजना यांचे महत्त्वाचे कागदपत्रे या बागेत ठेवली जातात. त्यामुळे हे बजेट अशा रंगाच्या बागेत ठेवले जाते जो आकर्षक असेल, जो सर्वांचे लक्ष खेचून घेईल त्यामुळेच लाल रंगाची निवड करण्यात आली.

Budget 2024
Budget 2024: 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

दुसरी गोष्ट अशी की भारतीय परंपरेत लाल रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठल्याही प्रकारचे धार्मिक ग्रंथ, गीता, रामायण, महाभारत यांना झाकण्यासाठी लाल रंगाचे कापड वापरले जाते. तसेच न्यायालयातही शपथ घेण्यासाठी गीतेवर हात ठेवला जातो. ती गीता ही लाल रंगात गुंडाळलेली असते. त्यामुळे बजेट सादर करण्यासाठी लाल रंगाची निवड करण्यात आली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.