Job Opportunities: खुशखबर! या वर्षी देशातील ७७ टक्के कंपन्या करणार मेगाभरती, नवीन जागा होणार तयार

Job Opportunities: भारतातील युवा वर्गासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे.
Job Opportunities
Job OpportunitiesEsakal
Updated on

Job Opportunities: गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील कित्येक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. मोठमोठ्या टेक जायंट कंपन्याही हजारोंच्या संख्येत कामगार कपात करताना दिसून येत आहेत.

अशातच, भारतातील युवा वर्गासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. देशातील ७७ टक्के कंपन्या यंदाच्या आर्थिक वर्षात मेगाभरती करणार आहेत.

एका ऑनलाईन सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भरती जुन्या जागांवर रिप्लेसमेंट म्हणून, तसेच नवीन जागा तयार करून त्याठिकाणी देखील होणार आहे. कोलकाताच्या जीनियस कन्सल्टन्ट्स या कंपनीने २,१०० कंपन्यांचे सर्वेक्षण करून हा रिपोर्ट तयार केला आहे.

या सर्वेक्षणात बँकिंग, फायनान्स, कंस्ट्रक्शन, इंजिनिअरिंग, शिक्षण, एफएमजीसी, हॉस्पिटॅलिटी, एचआर, आयटी, आयटीईएस, बीपीओ, लॉजिस्टिक्स, मीडिया, ऑईल अँड गॅस, फार्मा, पॉवर, रिअल इस्टेट, ऑटो, टेलिकॉम आणि रिटेल अशा विविध क्षेत्रांमधील कंपन्यांचे एचआर आणि एक्झ्युक्युटिव्ह यांचा समावेश करण्यात आला होता.

Job Opportunities
IBM Pause Hiring : AI ची कुऱ्हाड पडलीच! IBM कडून आता 7800 जागेवर AI ची भरती

या सर्वेक्षणात असं समोर आलं, की दक्षिण आणि पश्चिम भागातील कंपन्यांमध्ये भरतीची शक्यता अधिक आहे.

सहभागी एचआर पैकी ३६.०६ टक्के व्यक्तींनी चार ते सात वर्ष अनुभव असलेल्या उमेदवारांची भरती करण्याचा आपण विचार करत असल्याचे सांगितले. तर, ९ टक्के एचआर १३ वर्षांहून अधिक अनुभवी उमेदवारांचा विचार करत असल्याचे समोर आले.

Job Opportunities
Quiet Hiring : कर्मचारी कपाती दरम्यान सुरू झाला नवा ट्रेंड; जाणून घ्या काय आहे Quiet Hiring

पगारवाढ कशी होणार?

यंदाच्या आर्थिक वर्षात मध्यम-स्तरावरील कर्मचाऱ्यांची चांगली इन्क्रिमेंट होणार असल्याचे मत ५७.८ टक्के कंपन्यांनी व्यक्त केले.

तर, २१.१ टक्के कंपन्या ज्युनिअर आणि सीनिअर स्तरावरील कर्मचाऱ्यांना चांगली इन्क्रिमेंट देण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट झाले.

Job Opportunities
AI Job Losses: जगभरात नोकर कपात होत असताना Zerodha CEO म्हणतात, आम्ही कोणालाही कामावरुन...

जॉब पोर्टलना पहिली पसंती

या रिपोर्टमधून असंही समोर आलं, की बहुतांश कंपन्या नवीन उमेदवार निवडीसाठी ऑनलाईन जॉब पोर्टलना प्राधान्य देतात. त्यानंतर एआय टेक्नॉलॉजी आधारित अ‍ॅप्स, कॅम्पस हायरिंग आणि जॉब कन्सल्टन्ट्स यांचा क्रमांक लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.