Business Sector in India: देशातली सगळ्या जुनी कंपनी; आज बाजारात महत्त्वाचं स्थान; पाकिस्तानशीही आहे संबंध

अथक परिश्रम करून या कंपन्यांनी बाजारपेठेत आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. या कंपन्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या कंपन्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेतही मोठा वाटा आहे.
Business Sector in India
Business Sector in IndiaSakal
Updated on

व्यवसाय भारताच्या रक्तात आहे. भारताला नेहमीच व्यवसायाची आवड आहे. इतिहासावर नजर टाकल्यास भारताचा रोमन साम्राज्य आणि भूमध्यसागरीय देशांशी इ.स.पूर्व ३० पासून व्यापार झाल्याचे संकेत मिळतात. आज देशातील सर्वात मोठ्या आणि जुन्या कंपन्याही स्वातंत्र्यानंतर नव्हे, तर स्वातंत्र्याच्या दोनशे वर्षांपूर्वी सुरू झाल्या होत्या.

अमेरिका आणि चीननंतर जगात सर्वाधिक स्टार्टअप्स भारतात आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की देशातील सर्वात जुनी कंपनी कोणती आहे आणि ती कधी स्थापन झाली. हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अथक परिश्रम करून या कंपन्यांनी बाजारपेठेत आपलं स्थान टिकवून ठेवलं आहे. या कंपन्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या कंपन्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेतही मोठा वाटा आहे.

Business Sector in India
Business Idea : दीड लाख गुंतवा अन् महिन्याला ६० हजार कमवा; बिझनेसची यापेक्षा भन्नाट आयडीया तुम्ही ऐकलीच नसेल!

भारतातील सर्वात जुनी कंपनी

जर आपण देशातील सर्वात जुन्या कंपनीबद्दल बोललो तर ती भारतातील वाडिया समूह आहे. वाडिया समूहाची स्थापना १७३६ मध्ये सुरत इथं जन्मलेले पारसी व्यापारी लवजी नुसरवानजी वाडिया यांनी केली होती. नुसरवानजी वाडिया यांना १७३६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडून जहाजे आणि गोदी बांधण्याचं कंत्राट मिळालं आणि इथून कंपनी सुरू झाली.त्यांनी ३५५ जहाजं बांधली. लवजी आणि त्यांचा भाऊ सोराबजी यांनी मिळून मुंबईचं पहिलं डॉकयार्ड बांधलं, जे आशियातील पहिलं ड्राय डॉक होते.

पाकिस्तानचाही संबंध आहे

देशातील सर्वात जुन्या कंपनीचा इतिहास ३०० वर्षांचा आहे. १७३६ मध्ये वाडिया ग्रुपची स्थापना झाली तेव्हा ते मुघल सम्राट मुहम्मद शाह यांच्या अधिपत्याखाली होते. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर १७३६ मध्ये गुजरातमधील सुरत इथल्या वाडिया कुटुंबाने सर्वप्रथम कंपनी संकल्पना सुरू केली.पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची कन्या दीना वाडिया या कुटुंबाच्या सून झाल्या. वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन तिने भारतीय पारशी कुटुंबात लग्न केलं.

Business Sector in India
Business Idea: 9 ते 5 नोकरीचा कंटाळा आलाय? घरी बसून करा हे 5 बिझनेस, पगारापेक्षा जास्त कमवाल

कोट्यवधींची संपत्ती

आज वाडिया समूहाची संपत्ती अब्जावधींच्या घरात आहे. समूहाचा व्यवसाय सध्या एव्हिएशन, हेल्थकेअर, केमिकल आणि एफएमजीसी क्षेत्रात पसरलेला आहे. कंपनीने १८७९ मध्ये बॉम्बे डाईंगची स्थापना केली. बॉम्बे डाईंग हा आज वाडिया ग्रुपचा सर्वात प्रसिद्ध ब्रँड आहे. आजपर्यंत, वाडिया समूहाचे एकूण मूल्य किंवा एकूण इक्विटी ५१,४०० कोटी रुपये आहे. ही कंपनी एव्हिएशन, हेल्थकेअर, एफएनसीजी आणि हेल्थकेअर क्षेत्रात काम करत आहे. वाडिया ग्रुप हा आयपीएल संघ किंग्स इलेव्हन पंजाबचाही मालक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.