आशियातील सर्वात श्रीमंत माणूस एकेकाळी मुंबईत एका चाळीत राहत होता. बिझनेस टायकून मुकेश अंबानी आणि भाऊ अनिल अंबानी एका खोलीत वाढले होते ते 8-9 लोक भुलेश्वरमध्ये एकत्र राहत होते ही कथा तर सर्वांनाच माहित आहे. रिलायन्सचे दूरदर्शी संस्थापक धीरूभाई अंबानी अगदी शेवटपर्यंत त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपडत होते.
पण अंबानी कुटुंबाचा उदय ही मुंबईच्या चाळींमधली एकमेव यशोगाथा नाही. आणखी एक म्हणजे एचडीएफसीचे संस्थापक एचटी पारेख. पण आज आपण आणखी एका बिझनेस टायकूनबद्दल बोलू ज्याने मुंबईच्या चाळीपासून सुरुवात केली ते म्हणजे डॅन्यूब ग्रुपचे अनिस साजन.
अनिस साजन हे मुकेश अंबानी सारखेच, मुंबईच्या चाळीत वाढले आहे, त्या चाळीचा विकास केला आणि दुबईतील सर्वात महागड्या मालमत्ता असलेल्या ठिकाणी एक इमारत विकत घेतली आहे. ते घाटकोपरच्या पंत नगर चाळीत लहानाचे मोठे झाले आणि आता दुबईतील एमिरेट्स हिल्समध्ये त्यांच्याकडे पॅलेशियल व्हिला आहे.
वडील अस्कर अली साजन यांच्या अकाली निधनानंतर साजन कुटुंबाला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. त्यांनी एकेकाळी २०० रुपयांच्या कमिशनसाठी सेल्समन म्हणून काम केलं होतं. अनिस साजनने त्यांचा मोठा भाऊ रिजवान साजनला अब्ज डॉलर्सचा डॅन्यूब ग्रुप तयार करण्यास मदत केली. अनिस साजन हे आज आखाती व्यापार समूहाचे उपाध्यक्ष आहेत.
अनिस १९९२ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी दुबईला आले. त्यांचं पहिलं काम डॅन्यूब ग्रुपच्या सॅनिटरी डिव्हिजनची स्थापना करणे हे होतं. कारण मोठा भाऊ रिजवानने इमारती लाकूड विभागावर लक्ष केंद्रित केलं होतं. एकत्रितपणे, त्यांनी समूहाला १ बिलियन डॉलरपेक्षा जास्त उलाढाल गाठली, जे मध्य-पूर्व प्रदेशातील सर्वात प्रमुख भारतीय व्यावसायिक कुटुंबांपैकी एक बनले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.