Bio-waste पासून तयार केली Eco Friendly कटलरी, तामिळनाडूच्या कल्याण कुमारची अनोखी कल्पना

अनेकदा व्यवसाय करण्यासाठी आणि त्यात यश मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही शिक्षणाची किंवा ड्रिग्रीची आवश्यकता नसते. तुमच्यातील कल्पकता आणि मेहनत करण्याची इच्छा यांच्या जोरावर तुम्ही व्यवसाय Business उभारून त्यात नक्कीच यश मिळवू शकता
बायो वेस्ट पासून कटलरी
बायो वेस्ट पासून कटलरीEsakal
Updated on

अनेकदा व्यवसाय करण्यासाठी आणि त्यात यश मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही शिक्षणाची किंवा ड्रिग्रीची आवश्यकता नसते. तुमच्यातील कल्पकता आणि मेहनत करण्याची इच्छा यांच्या जोरावर तुम्ही व्यवसाय Business उभारून त्यात नक्कीच यश मिळवू शकता. Business Success Story of Tamil Nadu youth producer of eco friendly cutlery

याचंच एक उदाहरण म्हणजे तामिळनाडूमधील कल्याण कुमार. कल्याण कुमार यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. बायो वेस्ट Bio Waste पासून ते कटरली तयार करतात. यातून त्यांना लाखोंचा नफा Profit होतो.

हा व्यवसाय Business सुरु करण्यासाठी कल्याण कुमार यांनी कोणतीही डिग्री मिळवलेली नाही. कुटुंबातील काही अडचणींमुळे कल्याण कुमार यांना त्यांचं BBAचं शिक्षण मध्येच सोडावं लागलं होंतं. त्यानंतर त्यांनी वडिलांना त्यांच्या फॅक्टरीमध्ये वेगवेगळ्या लहान मशीन तयार बनवण्यासाठी मदत करण्यास सुरुवात केली.

ज्यावेळी तामिळनाडू सरकारने राज्यामध्ये प्लॅस्टिकबंदी Plastic Ban जाहीर करून कपड्याची पिशवी किंवा पर्यायी वापरावर भर देण्यासाठी योजना राबवण्यास सुरुवात केली. त्यावेळी कल्याण कुमार यांना देखील रोजगार Employment वाढवण्यासाठी एक नवी कल्पना सुचली.

पिशवीसोबतच अनेक ठिकाणी चहाचे, ज्युसचे कप, प्लास्टिक प्लेट किंवा डबे वापरले जात असून या प्लास्टिकच्या वस्तूंना देखील पर्यावरण पूरक पर्याय उपलब्ध असावेत असं त्यांना वाटलं. यावर त्यांनी अभ्यास करण्यास आणि माहिती मिळवण्यास सुरुवात केली.

हे देखिल वाचा-

बायो वेस्ट पासून कटलरी
Plastic Waste पासून तयार केले फॅशनेबल कपडे, बाप-लेकाने उभारली १०० कोटींची कंपनी

२०१७ सालामध्ये तयार केली मशीन

२०१७ सालामध्ये कल्याण यांना प्लास्टिक वस्तूंना पर्यायी वस्तू तयार करणारी मशीन तयार करण्याचा विचार आला. त्यावेळी प्लास्टिकऐवजी अनेकजण केवळ सुपारीच्या पानांपासून प्लेट, द्रोण किंवा थाळ्या तयार करंत. यावेळी इतर बायोवेस्ट वापरून कटलरी तयार करण्यासाठी मशीन तयार करण्याचं त्यांनी ठरवलं.

अखेर कल्याण कुमार यांनी त्यांच्याच फॅक्टरीमध्ये इको फ्रेण्डली कटरली तयार करण्यासाठी एक खास मशीन तयार केलं. या मशीनमध्ये बायो वेस्ट म्हणजेच गहू, तांदळाचा भुसा, केळीची पानं, चिंचेच्या बिया, भूईमूगाची टरफलं अशा कचऱ्यापासून कटलरी बनवली जाते. एकाच मशीनच्या मदतीने विविध प्रकारची कटलरी बनवणं शक्य आहे.

महिन्याला १० लाख इको फ्रेण्डली कपची निर्मिती

कल्याण कुमार हे त्यांनी तयार केलेल्या मशीनमध्ये आज महिन्याला १० लाख चहाचे कप तयार करुन त्याची विक्री करतात. कल्याण यांनी सुरुवातील तयार केलेल्या मशीनमध्ये काही बदल करत त्या अपग्रेड करून विविश कटलरी तयार करणाऱ्या मशीनची निर्मिती केली आहे. या मशिनची किंमत ३ लाख रुपयांपासून ३५ लाखांपर्यंत आहे.

हाताने किंवा मॅन्युअली ऑपरेट होणाऱ्या मशीनमध्ये दिवसाला जवळपास १ हजार चहाचे कप तयार होतात. तर संपूर्णपणे स्वयंचलित मशीनवर दिवसाला १० हजारांहून अधिक कप तयार केले जातात.

या मशिन्सच्या निर्मितीनंतर कल्याण कुमार यांना आता प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी बायोवेस्ट पासून तयार करण्यात येणाऱ्या कटलरीची इतरांपर्यंत माहिती पोहचवायची आहे. तसंच या प्रक्रियेत इतरांना सामील करून, त्यांना ट्रेनिंग देऊन रोजगार देण्याचं काम त्यांना करायचं आहे. कोणतही उच्च शिक्षण किंवा डिग्री न मिळवतादेखील कल्याण कुमार आज लाखोंचं उत्पन्न मिळवत आहेत.

हे देखिल वाचा-

बायो वेस्ट पासून कटलरी
Nirma Success Story: मुलीच्या निधनानंतर तिच्या नावानं वडिलांनी उभारली कंपनी..उलाढाल गेली ७ हजार कोटींवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.