Bournvita News : बॉर्नविटा 'हेल्थ ड्रिंक' कॅटेगरीतून काढून टाका, सरकारने काढली अधिसूचना; नेमकं कारण काय?

केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना बॉर्नविटाला हेल्थ ड्रिंक कॅटेगरीमधून काढून टाकण्यास सांगितले आहे.
Centre  govt asks e-commerce websites to remove Bournvita from health drink  category marathi News
Centre govt asks e-commerce websites to remove Bournvita from health drink category marathi News
Updated on

केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना बॉर्नविटाला हेल्थ ड्रिंक कॅटेगरीमधून काढून टाकण्यास सांगितले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एक नोटिफिकेशन जारी केलं असून यानुसार सर्व ई-कॉमर्स वेबसाइट्सना आपल्या प्लॅटफॉर्मवर बॉर्नविटासह सर्व पेय पदार्थांना हेल्दी ड्रिंक कॅटगरीतून बाहेर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

नोटिफिकेशनमध्ये काय म्हटलंय?

मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीफिकेशननुसार राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, बाल अधिकार संरक्षण आयोग (सीपीसीआर) कायदा २००५ च्या कलम (३) अंतर्गत एक स्थापन केलेल्या संस्थेने तपास केला. या तपासात हे हेल्थ ड्रिंक्सच्या व्याख्येत बसत नसल्याचे समोर आले आहे.

Centre  govt asks e-commerce websites to remove Bournvita from health drink  category marathi News
Fire news: मुंबईतील बिकेसीतील सरकारी कार्यालयाला भीषण आग

कारण काय आहे?

या महिन्याच्या सुरूवातीला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना डेयरी आधारित, धान्य किंवा माल्ट आधारित पेय पदार्थाना हेल्दी ड्रिंग्स किंवा एनर्जी ड्रिंक म्हणून लेबल न करण्याबाबत निर्देश दिले होते. यासाठी कारण देताना हेल्दी ड्रिंक शब्दाची देशाच्या अन्न कायद्यात व्याख्या करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.

Centre  govt asks e-commerce websites to remove Bournvita from health drink  category marathi News
Arvind Kejriwal: तिहारमध्ये केजरीवालांसोबत पत्नी सुनीतांची समोरासमोर भेट होऊ दिली नाही; संजय सिंहांनी केला महत्त्वाचा दावा

FSSAI कडून ई-कॉमर्स वेबसाईट्सना सूचना देण्यात आल्या की चुकीच्या शब्दांचा वापर केल्याने ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे सर्व ई-कॉमर्स फूड बिझनेस ऑपरेटर्स (एफबीओ) यांनी अशा पेय पदार्थांना हेल्थ ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स श्रेणीमधून हटवून किंवा वेगळं करत यामध्ये सुधारणा केली जावी. FSSAI ने स्पष्ट केलं की हेल्थ ड्रिंक शब्द FSS कायद्यात २००६ किंवा खाद्य उद्योगांना नियंत्रित करणाऱ्या नियम आणि अटींची व्याख्या प्रणाणित नाहीये. तसेच एनर्जी ड्रिंक्स हा शब्द फक्त कार्बोनेटेड आणि नॉन- कार्बोनेटेड पाण्यावर आधारीत पेयांसारख्या उत्पादनांसाठी वापरण्यास परवानगी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.