Profitable Agriculture Business Ideas: व्यावसायिक पातळीवर शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात कधी शेतमालाला योग्य बाजार भाव मिळत नाही तर कधी निसर्गाचा प्रकोप.
कधी उत्पादन कमी तर कधी बाजारपेठ Market नाही. या आणि अशा अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांना शेती करावी की नाही हा प्रश्न आता भेडसावत आहे. Do Agro supplementary Business for more profit from your farm
या समस्यांमुळे अनेकदा शेती ही फायद्याची कमी आणि तोट्याची जास्त ठरते. पण शेतीतून अधिक उत्पन हवं असेल तर यासाठी शेतीपूरक व्यवसाय Agro Business करणं गरजेचं आहे. शेतीपूरक व्यवसायामुळे शेतीचे Farming नुकसान होण्याचा धोका कमी होतो तसंच अधिकच्या उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होतो.
आधीच शेती तोट्यात त्यात शेतीपूरक व्यवसाय कसा करावा आणि कोणता करावा असा प्रश्न अनेकांना पडतो. तर आम्ही तुम्हाला असे दहा शेतीपूरक व्यवसाय सांगणार आहोत ते तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात आणि तुम्हाला चांगलं उत्पन्नही मिळवून देऊ शकतात.
शेतीपूरक व्यवसाय हे तुमच्या शेतीवर आणि पशुधनावर आधारित असल्याने गुंतवणूक कमी असते. अनेक व्यवसायांसाठी शासनाकडून अनुदानही उपलब्ध करून दिलं जातं. सुरुवातील लहान स्तरावर शेतीपूरक व्यवसाय सुरू करून तुम्ही कालांतराने त्याचा विस्तार वाढवू शकता.
1. दुग्ध व्यवसाय- दुग्ध व्यवसाय हा भारतातील परंपरागत शेती पूरक व्यवसाय आहे. गोपालन किंवा म्हैस पालन करून हा व्यवसाय करू शकतो. यासाठी तुमच्या शेतातील पीकाचा चारा किंवा ज्वारी बाजरीचा कडबा पशुखाद्य म्हणून वापरल्यास खर्च कमी होईल.
शिवाय जनावरांच्या मलमूत्राचा शेतात खत म्हणून वापर करू शकता. सुरुवातीला कमी जनावरं ठेवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि कालांतराने व्यवसाय वाढवू शकता. कारण भारतात दूधाची मागणी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
2. शेळीपालन- शेळीपालनातूनही शेतकरी चांगला नफा मिळवू शकतो. अखेर शेळी ही गरीबांती गाय म्हणून ओळखली जाते. मात्र ती शेतकऱ्याला श्रीमंत देखील करू शकते. शेळी ही कोणत्याही वनस्पतीवर जगते. मग तो कोणताही पालापाचोळा असो.
त्यामुळे पशुखाद्यावर जास्त खर्च होत नाही. पुरेशी जागा उपलब्ध असेल तर हा व्यवसाय करणं फायदेशीर ठरेल. शेळीच्या आणि मेंढीच्या मांसाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून त्याला भावही चांगला मिळतो.
खास करून हॉटेल व्यवसाय विस्तारल्याने मागणी वाढली आहे. शेळीपालन हा कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा व्यवसाय आहे.
3. भाजीपाला शेती- धान्यांसोबत रोजच्या जिवनातील महत्वाचा घटक म्हणजे भाजीपाला. रोजच्या जेवणासाठी घराघरात भाजीपाला गरजेचा असतो. म्हणजेच मोठी मागणी असणाऱ्या भाजीपाला लागवडीमुळे अधिकच उत्पन मिळू शकतं.
योग्य नियोजन करून भाजीपाला लागवड केल्यास शेतकऱ्याला चांगला नफा मिळवणं शक्य आहे. अलिकडे सेंद्रिय भाजीपाल्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे तुम्ही सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून त्याचं योग्य मार्केटिंग केल्यास फायदा होईल.
हे देखिल वाचा-
4. मधमाशी पालन- अलिकडे अनेकजण आरोग्याची काळजी घेण्यासाठी साखरेचा वापर कमी करू लागले आहेत. यासाठी काहीजण मधला पसंती देत आहेत. बाजारात शुद्ध मधाला मोठी मागणी आहे. मधमाशी पालनातून कमी गुंतवणूकीत जास्त उत्पन्न मिळवणं शक्य आहे.
5. रेशीम उद्योग- शेतीसोबतच करण्यासारख आणखी एक उद्योग म्हणजे रेशीम उद्योग. यात तुती लागवड करून रेशीम किड्यांच संगोपन करुन रेशीम तयार केली जाते. रेशीम उद्योगाला भारतात कुटीर उद्योगाचा दर्जा मिळाला आहे. यातून चांगला नफा मिळवता येतो.
6. गांडुळ खत उत्पादन- वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पोषक घटक आणि वाढीसाठी आवश्यक असणारे हार्मोन्स गांडुळ खतातून मिळतात.
फळं, फूलं आणि भाजीपाला शेतीला गांडुळखत फायद्याचं आहे. त्यामुळे गांडुळ खताला मोठी मागणी आहे. गांडुळ खताच्या विक्रितून चांगल उत्पन्न मिळतं त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी पाहणं गरजे आहे.
7. औषधी वनस्पतींची लागवड- अलिकडे अनेकजण आयुर्वेदिक औषोधोपचाराकडे वळू लागले आहेत. आयुर्वेदिक उपचारांचे साईड इफेक्ट नसल्याने त्याचं महत्व वाढू लागले आहेत. त्यात मोठ मोठ्या आजारांवरही आयुर्वेदामुळे निदान शक्य आहे हे आता लोकांना पटू लागलंय.
परिणामी औषधी आणि आयुर्वेदिक वनस्पतींची मागणी वाढू लागली आहे. काही औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी शासनाकडूनही मदत केली जाते. यात रोपं, बियाणं पुरवणं, लागवडीविषयी माहिती देणं,बाजारपेठ देणं अशी मदत मिळते.
8. नर्सरी आणि व्यवस्थापन- शेतीसोबतच नर्सरी हा देखील फायदेशीर व्यवसाय आहे. अनेकांना नर्सरी म्हणजे केवळ शोभेच्या फूलझाडांची वाटते. मात्र प्रत्यक्षात नर्सरी कशी असावी कोण्यत्या प्रकारची रोपं त्यात असावी हे तुमच्या हवामानवर अवलंबून असतं.
यात फूलझाडांसह , फळ झाडांची रोपंही तुम्ही तयार करू शकता. बियाणांपासून रोपं तयार करून विकताना चांगला नफा मिळतो.
9. बियाणं उत्पादन आणि मार्केटिंग- शेतीसाठी महत्वाचं असंत ते म्हणजे बियाणं. कारण तुम्ही जे पेरता ते उगवं. यासाठीच तुम्ही जर बियाणांवर योग्य प्रक्रिया करून त्याचं योग्य मार्केटिंग केलं तर चांगलं उत्पन्न मिळू शकतं.
10. मशरुम उत्पादन- बाजारात मशरुमला चांगली मागणी असून दरही चांगला मिळतो. मशरुममध्ये खाण्यासाठी वापरला जाणारा मशरुम आणि औषधी वापरासाठी अशी दोन्हीची लागवड करता येते. कमी जागा, कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळवून देणारा हा शेतीपूरक व्यवसाय आहे.
या व्यवसायांव्यतिरिक्त पारंपरिक असा फूलशेती, कुक्कुटपालन, मत्सपालन हे व्यवसाय करूनही तुम्ही अधिकच उत्पन्न मिळवू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.