इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी भारताची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या हा देशाच्या टिकावासाठी सर्वात मोठा धोका व्यक्त केला आहे. प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे दीक्षांत समारंभात त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यावेळी नारायण मूर्ती यांनी संवाद साधला आहे. ते म्हणाले की, आणीबाणीच्या काळापासून लोकसंख्या नियंत्रणाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले गेले आहे. ही चूक आता देशाचे भविष्य धोक्यात आणणारी आहे.