IPL 2023 Final : तब्बल 3.2 कोटी लोकांनी स्ट्रीम केली फायनल मॅच; जिओ सिनेमाने रचला नवा इतिहास

यावर्षी आयपीएल मोफत स्ट्रीम करता येईल असं जिओने जाहीर केलं होतं.
JioCinema IPL 2023
JioCinema IPL 2023Esakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) अंतिम सामना सोमवारी रात्री पार पडला. यामध्ये गुजरातला शह देत चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना चक्क रात्री दोन वाजेपर्यंत लांबला. मात्र, तरीही तब्बल 3.2 कोटी लोकांनी हा सामना स्ट्रीम करून पाहिल्याचं आकडेवारीमध्ये समोर आलं आहे. यामुळे जिओ सिनेमाने नवीन रेकॉर्ड केला आहे.

यापूर्वी २४ मे रोजी झालेल्या गुजरात वि. चेन्नई सामन्याला तब्बल 2.5 कोटी लोकांनी जिओ सिनेमा अ‍ॅपवर स्ट्रीम केलं होतं. कोणत्याही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला एकाच वेळी एवढ्या लोकांनी स्ट्रीम केलं नव्हतं. जिओने ही कामगिरी करून रेकॉर्ड केला होता. त्यानंतर कालच्या फायनलमध्ये जिओने आपलाच रेकॉर्ड ब्रेक (JioCinema Breaks World Record With 3.2 Crore Concurrent Views) केला.

JioCinema IPL 2023
MS Dhoni IPL Final : आता चाहत्यांना निराश करणार नाही... धोनी नाणेफेकीनंतर काय म्हणाला?

1,300 कोटी व्ह्यूज

जिओ सिनेमाने एकूण व्ह्यूजच्या बाबतीत देखील मोठा रेकॉर्ड केला आहे. या ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील एकूण व्हिडिओ व्ह्यूजची संख्या 1,300 कोटींच्या वर गेली आहे

मोफत दाखवलं IPL

जिओने यावर्षीपासून 2027 पर्यंत आयपीएलचे डिजिटल राईट्स विकत घेतले आहेत. हक्क मिळाल्यानंतर जिओने आपल्या यूजर्सना मोठं गिफ्ट दिलं. यावर्षी आयपीएल मोफत स्ट्रीम करता येईल असं जिओने जाहीर केलं होतं.

JioCinema IPL 2023
CSK Won 5th IPL Title : जडेजा, रहाणे की रायडू...चेन्नईच्या विजयाचा हिरो कोण?

फायनलचा थरार

दरम्यान, फायनलमध्ये आधी बॅटिंग करताना गुजरात जायंट्सने चेन्नईसमोर 215 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आतापर्यंतच्या सर्व आयपीएल फायनलमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यानंतर चेन्नईची बॅटिंग सुरू झाल्यानंतर लगेच पावसाचा व्यत्यय आला. याचवेळी जिओने 3.2 कोटी स्ट्रीमर्सचा टप्पा गाठला होता.

पाऊस थांबल्यानंतर चेन्नईला 15 ओव्हर्समध्ये 171 धावांचे सुधारीत लक्ष्य देण्यात आले. चेन्नईच्या सर्वच फलंदाजांनी मोलाचं योगदान देत विजय खेचून आणला.

JioCinema IPL 2023
IPL 2023 Prize Money: चॅम्पियन चेन्नई झाली मालामाल! हरल्यानंतरही GTला मिळाले कोटी; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण लिस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.