घर बसल्या मिळवा GST नंबर, जाणून घ्या आवश्यक कागदपत्रं

How to apply for GST Number: GST रजिस्टेशनसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही घरबसल्या तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर हे रजिस्टेशन करू शकता
How to apply for GST Number
How to apply for GST NumberEsakal
Updated on

How to apply for GST Number: भारतामध्ये वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर लादण्यात आलेला कर म्हणजेच GST. वस्तू खरेदी करणाऱ्याला किंवा सेवा उपभोगणाऱ्याला हा कर भरावा लागत असला तरी विक्रेता Seller किंवा सेवा पुरवठादारामार्फत हा कर सरकारपर्यंत Government पोहचतो. यासाठी विक्रेत्यांना GST रजिस्टेशन करावं लागतं. Know How To Register your business for Goods and Services Tax GST

ज्या विक्रेत्याचं किंवा व्यावसायिकाचं वार्षिक उत्तन्न हे २० लाख किंवा त्याहून अधिक आहे त्या प्रत्येकाला जीएसटी रजिस्ट्रेशन GST अनिर्वाय आहे. या रजिस्ट्रेशनसाठी शासनाकडून Government कोणतही शुल्क आकारलं जात नाही.

मात्र जर दिलेल्या वेळेत विक्रेता किंवा एखाद्या व्यावसायिकाने रजिस्ट्रेशन पूर्ण केलं नाही तर त्याला दंड Fine भरावा लागू शकतो. टॅक्सच्या १० टक्के किंवा १० हजार रुपयांची पेनल्टी विक्रेत्याला भरावी लागू शकते. 

तसचं टॅक्स चोरीच्या प्रकरणात विक्रेत्याला मोठा भुर्डंद भरावा लागू शकतो. तर एखाद्या विक्रेत्याचा किंवा व्यवसायिकाचा व्यवसाय अनेक राज्यांमध्ये असेल तर त्याला प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळं GST रजिस्टेशन करावं लागतं. जीएसटी रजिस्ट्रेशन केल्यानंतर व्यवसायिकाला १५ अंकी आयडेंटिफिेकेशन नंबर प्राप्त होते. प्रत्येक राज्यासाठी तो वेगवेगळा असतो.  

GST रजिस्टेशनसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही घरबसल्या तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर हे रजिस्टेशन करू शकता. 

हे देखिल वाचा-

How to apply for GST Number
Maharashtra Government : आर्थिक गुंतवणुकीची खबरदारी अन् सायबर हल्ले रोखण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल
  • यासाठी https://reg.gst.gov.in/registration/ या जीएसटी पोर्टलवर जाऊन "New Registration” पर्यायावर क्लिक करा. 

  • इथं विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा. 

  • इथे 'I am a' ड्रॉप डाउन मेन्यू मध्ये Taxpayer पर्याय निवडा.

  • तुमचं राज्य आणि जिल्हा कोणता ते टाइप करा.तसचं कोणता व्यवसाय आहे याची माहिती द्या. 

  • बिझनेसच्या पॅन किंवा टॅन क्रमांकाची माहिती भरा.

  • ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर भरा. जो मोबाईल नंहर तुम्ही इथं द्याल त्यावर ओटीपी येईल हे लक्षात घ्या. त्यामुळे योग्य नंबर द्या. 

  • Proceed वर क्लिक करा. पुढील पानावर तुम्हाला आलेला ओटीपी द्यावा लागेल. 

  • स्क्रीन वरील  Temporary Reference Number (TRN) नंबर नोट करून ठेवा. 

  • यानंतर GST पोर्टलवरील https://reg.gst.gov.in/registration/  लिंक क्लिक करा आणि 'Temporary Reference Number (TRN)' सिलेक्ट करा. 

    हे देखिल वाचा-

How to apply for GST Number
Government Scholarship : केंद्र सरकारच्या या ५ शिष्यवृत्ती लावतील तुमच्या शिक्षणाला हातभार
  • TRN आणि कॅप्चा भरून Proceed वर क्लिक करा. 

  • पुढील पानावर मेल आणि फोनवरील ओटीपी भरून Proceed वर क्लिक करा. 

  • यानंतर पुढील पेजवर Application Status दिसेल. या पेजवर उजव्या बाजुला एडिटचा पर्याय दिसेल. हा पर्याय क्लिक करावा.

  • पुढील पेजवर जवळपास १० सेक्शन दिसतील ज्यात तुम्हाला योग्य ती माहिती भरायची आहे. तसचं आवश्यक कागदपत्र जोडायची आहेत. तुम्हाला कागदपत्रांची स्कॅन कॉपी जोडावी लागेल. 

  • त्यानंतर Verification पेजवर जाऊन डिक्लरेशन तपासा आणि अॅप्लिकेशन जमा करा. अॅप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज दिसेल. तसचं तुमच्या मोबाईलवर Application Reference Number (ARN येईल. या नंबरच्या मदतीने तुम्ही पोर्टलवर Application Status तपासू शकता. 

GST रजिस्टेशनसाठी आवश्यक कागदपत्रं (GST number required documents)

जीएसची रजिस्टेशनसाठी तुम्हाला पोर्टलवर आवश्यक दस्तावेजांची स्कॅन कॉपी जोडावी लागेल. यासाठी तुम्हाला  फोटो, पॅनकार्ड, आधार कार्ड, बँक डिटेल्स, अकाउंट स्टेटमेंट आणि कॅन्सल चेक जोडावा लागेल.

त्याच प्रमाणे ऑथराइजेशन फॉर्म, कर्जदात्याची माहिती, बिजनेस ऍड्रेस प्रूफ, इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट आणि बिजनेस रजिस्ट्रेशन प्रूफ, डिजिटल सिग्नेचर या गोष्टींची आवश्यकता भासेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.