नवी दिल्ली ः कारनिर्मिती करणारी कंपनी मारुती सुझुकीचा नफा ४८ टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीचे निष्कर्ष शुक्रवारी (ता. २६) जारी केले. या तिमाहीत कंपनीला ३,८७७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीतील कंपनीचा नफा २,६३२ कोटी होता.
मारुती सुझुकीचा पूर्ण वर्षासाठीचा नफा ६४ टक्क्यांनी वाढून १३,२०९ कोटी इतका झाला आहे. एक वर्षापूर्वी कंपनीचा नफा ८,०४९ कोटी होता. मारुतीने आपल्या भागधारकांना १२५ रुपये प्रतिशेअर लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. बाजार बंद झाल्यानंतर मारुतीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. कंपनीचा शेअर शुक्रवारी १६२.५० रुपयांनी घसरून १२,७६० रुपयांवर बंद झाला. मागील सहा महिन्यात या शेअरने २० टक्के जास्त परतावा दिला आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.