Ambareesh Murty Death : पेपरफ्रायचे सहसंस्थापक अंबरीश मूर्ती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Ambareesh Murty Death : पेपरफ्रायचे सहसंस्थापक अंबरीश मूर्ती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Pepperfry Cofounder Ambareesh Murty dies of heart attack
Pepperfry Cofounder Ambareesh Murty dies of heart attackEsakal
Updated on

पेपरफ्रायचे सह-संस्थापक अंबरीश मूर्ती (Ambareesh Murty Dies) यांचे लेहमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले झाले आहे. ऑनलाइन फर्निचर स्टोअरचे दुसरे सह-संस्थापक आशिष शाह यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

माझा मित्र, मार्गदर्शक, भाऊ, सोबती अंबरीश मूर्ती हे आता आपल्यात नाहीत हे कळवताना अत्यंत दुःख होत आहे. काल रात्री लेह येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झालं. कृपया त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना व जवळच्या लोकांना बळ मिळावं यासाठी प्रार्थना करा, असे शाह यांनी म्हटले आहे.

Pepperfry Cofounder Ambareesh Murty dies of heart attack
No Confidence Motion 2023 : अविश्वास प्रस्तावावर सेनेची तोफ २४ मिनिटे धडाडणार! जाणून घ्या लोकसभेत कोणाला किती वेळ मिळणार

Pepperfry चे सह-संस्थापक आणि सीईओ अंबरीश मूर्ती यांचे वयाच्या 51 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ते लेहमध्ये होते. अंबरीश यांनी 2012 मध्ये आशिष शाह यांच्यासोबत मुंबईत फर्निचर आणि होम डेकोर कंपनीची स्थापना केली. ते आयआयएम कलकत्ताचे माजी विद्यार्थी होते आणि ट्रेकिंगची आवड होती. पेपरफ्रायच्या आधी अंबरीश यांनी eBay मध्ये कंट्री मॅनेजर म्हणून काम केलं.

Pepperfry Cofounder Ambareesh Murty dies of heart attack
Ravikant Tupkar News : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत...; पक्ष सोडण्याबाबत रविकांत तुपकरांनी स्पष्ट केली भूमिका

अंबरीश मूर्ती यांचा प्रवास

अंबरीश यांनी 1990 च्या दशकाच्या सुरूवातीला दिल्ली टेक्नोलॉजिकल यूनिव्हर्सिटीत इंजीनियरिंग केली. त्यानंतर मध्ये आयआयएम कलकत्ता येथून एमबीए पूर्ण केलं. त्यानंतर कॅडबरी मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्यांनी काम केलं. कंपनीने त्यांना एरिया सेल्स मॅनेजर पद देऊन केरळला पाठवले. यानंतर २००१ साली त्यांनी कॅडबरी कंपनी सोडली.

त्यानंतर अंबरीश यांनी दोन वर्ष आयीआयसीआय प्रुडेंशियल एएमसी मध्ये म्यूच्युअल फंड प्रॉडक्ट लाँच करणे शिकून घेतले. 2003 मध्ये, त्यांनी पुन्हा नोकरी सोडली.

2005 मध्ये त्यांनी ब्रिटानियामध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून नोकरी स्वीकारली. त्याच्या 7 महिन्यांनंतर, eBay भारतात आले. यामध्ये ते अवघ्या दोन वर्षांत ते भारत, फिलीपिन्स आणि मलेशियाचे कंट्री हेड बनले.

eBay ला भारतीय व्यवसायात गुंतवणूक करायची नव्हती, म्हणून त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सहा वर्षांनंतर, 2012 मध्ये, त्यांनी आशिष शाह यांच्यासोबत होम डिकोर आणि फर्निचरसाठी एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Pepperfry सुरू केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.