PF Interest Rate Hike : सहा कोटी नोकरदारांना PM मोदींचं गिफ्ट! पीएफ व्याजदरात केली मोठी वाढ

EPFO ने आपल्या सहा कोटी खातेदारांना मोठी भेट दिली आहे. ईपीएफओने ईपीएफमधील ठेवींवरील व्याजद
EPFO
EPFOesakal
Updated on

EPFO ने आपल्या सहा कोटी खातेदारांना मोठी भेट दिली आहे. ईपीएफओने ईपीएफमधील ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आता पीएफ खातेदारांना ८.१५ टक्के व्याजदर मिळणार आहे.

EPFO ने इपीएफ वरील व्याज २०२१-२३ मध्ये कमी करून ८.१ केले होते. दरम्यान कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) सीबीटीच्या बैठकीत व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीटी ईपीएफओ बद्दल निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. केंद्रीय श्रम आणि रोजकार मंत्री भूपेंद्र यादव याचे प्रमुख आहेत. या व्याजदरातील वाढीचा तब्बल सहा कोटी सबस्क्रायबर्सना फायदा होणार आहे. यामध्ये ७२.७३ लाख जण आर्थीक वर्ष २२ मध्ये पेंशन मिळवत होते.

हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

EPFO
Savarkar Controversy : शरद पवारांचा उल्लेख करत सावरकरांच्या नातवाचा उद्धव ठाकरेंना सवाल, म्हणाले…

४० वर्षातील सर्वात कमी व्याजदर

सरकारने मागील वर्षी मार्च मध्ये पीएफ अकाउंटमध्ये जमा पैशांवरील व्याज दर ८.५ हून कमी करून ८.१ केला होता. हा व्याजदर तब्बल ४० वर्षातील सर्वात कमी व्याजदर होता. १९७७-७८मध्ये ईपीएफओ ने ८ टक्के व्याज दर निश्चित केला होता. मात्र यानंतर सतत हा व्यजदर ८.२५ किंवा त्यापेक्षा अधिक राहिला आहे. आर्थिकवर्ष २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के, २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के आणि २०१५-१६मध्ये ८.८ टक्के व्याज मिळत होतं.

EPFO
Toll Price Hike : मुंबई-पुणे प्रवास महागणार! एक्स्प्रेसवेवरील टोल वाढला, जाणून घ्या नवे दर

प्रत्येक नोकरदाराच्या पगारावर १२ टक्के कपात ईपीएफ अकाउंटसाठी केली जाते. एम्प्लॉयरकडून कर्मचाऱ्याच्या पगारात केलेल्या कपातीपैकी ८.३३ टक्के ईपीएस मध्ये तर ३.६७ टकक्के ईपीएफ मध्ये जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.