नोकरीएवजी एखादा व्यवसाय करावा अशी अनेकांची इच्छा असते. मात्र बिझनेस करायचा तर गुंतवणूक Investment करणं गरजेचं असा विचार करून अनेकजण त्यासाठी प्रयत्न करत नाहीत. Start your business with low capital to earn more money
तसचं अनेक नोकरी Job करणाऱ्यांना देखील नोकरी सोडून व्यवसाय करण्याची इच्छा असते. अर्थात गुंतवणूक किंवा भांडवलाचा Capital विचार करून पुढील पाऊल टाकण्याची हिंमत अनेकजण करत नाहीत.
मात्र असे अनेक बिझनेस किंवा व्यवसाय आहेत ज्यामध्ये अत्यंत कमी गंतवणुकीतून तुम्ही सुरुवात करू शकता. शिवाय या व्य़वसायातून तुम्हाला चांगली कमाई देखील होवू शकते.
अनेकांना कमी गुंतवणुकीत Investment व्यवसायांची कल्पना नसल्याने कोणता व्यवसाय करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी अशा काही बेस्ट बिझनेसचे पर्याय घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला अगदी कमी गुंतवणूक करावी लागेल.
विवाह संस्था- विवाह किंवा लग्न यावर कधीही मंदीचा प्रतिकूल परिणाम दिसून येत नाही. योग्य लग्न जुळण्यासाठी तसचं योग्य पार्टनर मिळण्यासाठी प्रत्येजण प्रयत्नशील असतो. आजही अशी अनेक कुटुंब आहेत जे आपल्य़ा मुलांसाठी योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी विवाह संस्थांची मदत घेता.
अलिकडे अनेक ऑनलाईन विवाहसंस्था सुरू झाल्या असल्या तरी अनेकजण पारंपरिक पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या विवाहसंस्थांवर विश्वास ठेवतात. यामुळेच तुम्ही अगदी कमी गुंतवणूकीत हा व्यवसाय सुरू करू शकतात.
अगदी घरातून देखील तुम्ही या व्यवसायाची सुरूवात करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ योग्य मार्केटिंगची आवश्यकता आहे.
हे देखिल वाचा-
फोटोग्राफी- गेल्या काही वर्षांमध्ये फोटोग्राफी आणि फोटोसेशनचा ट्रेंड वाढू लागला आहे. केवळ लग्नकार्य किंवा बर्थडे शिवाय अलिकडे प्रिवेडींग, प्रेग्नंसी फोटोशूट, बेबी फोटोशूट अशा विविध फोटोशूटचा ट्रेंड वाढतोय .
जर तुमच्याकडे फोटोग्राफीचं कौशल्य असेल किंवा फोटोग्राफी शिकण्याची तुमची इच्छा असेल तर एखादा साधासा कोर्स करूनही तुम्ही या व्यवसायाला सुरूवात करू शकता.
फोटोग्राफीचं कौशल्य आणि एक चांगला कॅमेरा ही या व्यवसायासाठी सुरुवातीची गुंतवणूक आहे. इंस्टाग्राम किंवा फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही तुमचं कौशल्य दाखवून प्रमोशन करू शकता. यामुळे तुम्हाला अधिक काम मिळण्यास मदत होईल.
रिअल इस्टेट ब्रोकर- अनेकजण रोज एका चांगल्या घराच्या शोधात असतात. अशामध्ये घर किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्रिसाठी ब्रोकरचा व्यवसाय तुम्ही करू शकता. अलिकडे लोकांकडे पुरेसा वेळ नसल्याने त्यांना भाड्याने राहण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी योग्य घर शोधण्यास पुरेसा वेळ नसल्याने रिअल इस्टेट ब्रोकर व्यवसाय चांगला चालू शकतो.
वेळेअभावी घर शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक इस्टेट एजंटची मदत घेतात. जर तुमची मार्केटमध्ये उतरून इस्टेटबद्दलची माहिती मिळवण्याची तयारी असेल तर अत्यंत कमी गुंतवणूक करून तुम्हाला या व्यवसायातून चांगला नफा कमवता येईल.
इन्श्यूरन्स एजन्सी- गेल्या काही वर्षांमध्ये विविध इन्श्यूरन्सचं महत्व वाढू लागलं आहे. अशामध्ये तुम्ही इन्श्यूरन्स एजन्सी सुरु करून चांगला नफा मिळवू शकता. सध्या अनेकजण विविध प्रकारचा विमा काढून सुरक्षिततेचे पर्याय निवडत असतात. अगदी हेल्थ इन्श्यूरन्स पासून टर्म प्लॅन किंवा कारचा विमा, घराचा विमादेखील काढला जातो.
त्यातही हेल्थ इन्श्युरन्स आणि टर्म प्लॅनबद्दल लोकांमध्ये जागरुकता वाढू लागली आहे. अशात तुम्ही एखादी इन्श्यूरन्स एजन्सी सुरू करू शकता. ज्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करावी लागणार नाही.
हे देखिल वाचा-
पोस्ट ऑफिस एजन्सी- जर तुम्ही राहत असलेल्या शहरात किंवा गावामध्ये आसपास काही किलोमीटर एखादं पोस्ट ऑफिस नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी म्हणजेच शाखा देखील सुरू करू शकता. केवळ १० हजार रुपयांची गुंतवणूक करून तुम्हाला पोस्टाची शाखा सुरू करता येईल.
घरबसल्या तुम्ही इतर कामं सांभाळूनही हे काम करू शकता. या व्यवसायात देखील तुम्हाला चांगला नफा कमावणं शक्य आहे.
या काही व्यवसायांसोबत वेगवेगळ्या विषयांवरील क्लासेस तसचं ऑनलाईन क्लासेस, बेकिंग, कला कुसरीच्या वस्तू तयार करून त्याची विक्री करणं असे काही व्यवसाय देखील तुम्ही कमी गुंतवणुकीत सुरूवात करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.