वयाची साठी पूर्ण झाली की नोकरी व्यवसायातून निवृत्त व्हायचं आणि शांततेत आरामदायी आयुष्य जगायचं किंवा नातवंडांसोबत आणि पाठ-पूजा करण्यात वेळ घालवायचा अशी आपल्या देशात अनेकांची मानसिकता असते.
मात्र जर तुमच्यात सतत काहीतर नाविन्य़पूर्ण करण्याची इच्छा आणि आवड असेल तर त्याला वयाची मर्यादा Age Limit नसते. याचंच उदाहरण म्हणजे मेरठमधील मधु प्रकाश. मेरठ मधील मधु प्रकाश यांनी वयाच्या ६०व्या वर्षी आपला स्वत:चा व्यवसाय Business सुरू केला. Success Story of Meerut Women Madhu Prakash started business in retirement age
व्यवसाय सुरु करून चांगली कमाई करण्यासोबतच त्यांनी त्यांच्याच वयोगटातील जवळपास २० महिलांनादेखील व्यवसायात सहभागी करत त्यांना रोजगारही Employment उपलब्ध करून दिला. मेरठमधील मधु प्रकाश यांचा होममेड प्राॅडक्ट तयार करण्याचा व्यवसाय आहे .
मधु प्रकाश आपल्या भाजीसोबतच फुलो-फलो नावाचा व्यवसाय करतात. यामध्ये त्या इतर महिलांच्या मदतीने घरगुती तयार करण्यात आलेले विविध मसाले, लोणची आणि मुखवास अशा पदार्थांची निर्मिती करून त्याची विक्री करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरामध्ये त्यांचे प्रोडक्टची विक्री होते.
आजी अजोबांकडून मिळालेलं ज्ञान आलं कामी
मेरठमधील मधु प्रकाश या एका व्यावसायिक कुटुंबात वाढल्या. त्यांचे अजोबा वेद्य होते. घरीच विविध जडीबूटी आणि मसाले कुटून ते तयार करत. तसंच त्यांच्या आजी विविध प्रकारची लोणची आणि मुखवास तयार करून विक्री करत. आजी अजोबांकडून मधु यांना लहानपणीपासूनच या सर्वाची माहिती मिळाली होती.
आजी अजोंबांकडून मिळालेलं ज्ञान वयाच्या उत्तरार्धात कामी येईल याची कल्पनादेखील मधू यांना केली नव्हती. मधू यांच्या पतीला कॅन्सरचं निदान झालं. त्यांची काळजी घेण्यात त्याचा वेळ जात होता.
हे देखिल वाचा-
भाचीने दिलं व्यवसायासाठी प्रोत्साहन
मधु यांची भाची सुगंधा यांना देखील कायमच व्यवसाय करण्याची इच्छा होती. आत्याच्या हाताची चव तिने चाखली होती. त्यामुळे सुगंधाने मधु यांना काही होम मेड प्राॅडक्ट तयार करण्यास प्रोत्साहन दिलं. २०२१ सालामध्ये त्यांनी केवळ ४ प्राॅडक्ट तयार करून त्याची विक्री करण्यास सुरुवात केली आणि फलो-फुलो नावाने व्यवसाय सुरू झाला.
मधु विविध मसाले आणि लोणची तयार करत तर सुगंधा सोशल मीडियाच्या मदतीने या उत्पादनांचं मार्केटिंग आणि जाहिरात करू लागल्या. विविध प्रदर्शनांमध्ये त्या सहभाग घेऊ लागल्या आणि उत्पादनांची विक्री वाढू लागली.
इतर महिलांना मिळाला रोजगार
आपल्या आत्त्याप्रमाणे तिच्याच वयाच्या इतर महिलांनी देखील असे घरगुती पदार्थ तयार करून त्याची विक्री करता येईल या विचाराने सुगंधा यांनी इतर महिलांना देखील या व्यवसायात सहभागी करण्याचा विचार केला. त्यानंतर मधु प्रकाश आणि सुगंधा यांनी ५०-६० वयोगटातील काही लहान व्यवसाय करणाऱ्या महिलांना आपल्या बिझनेसमध्ये सामील केलं.
देशभरामध्ये उत्पादनांची विक्री
ज्या महिला सुरुवातीला केवळ आसपासच्या परिसरात आपल्या घरगुती पदार्थांची विक्री करत होत्या त्या फलो-फुलोसोबत एकत्रित येऊन विविध पदार्थ तयार करू लागल्या. आज २० महिलांच्या टीमसोबत मधु आणि सुगंधा देशभरामध्ये जवळपास ४० प्राॅडक्टची विक्री करत आहेत.
हे देखिल वाचा-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.