Transport Business: कमी पैशात जास्त कमाई, टान्सपोर्ट बिझनेस करेल तुम्हाला मालामाल

how to start transport business: आज आम्ही तुम्हाला एक असा व्यवसाय सांगणार आहोत. ज्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही आणि ज्याची गरज मार्केटमध्ये कायम असते
how to start transport business
how to start transport businessEsakal
Updated on

how to start transport business: नोकरी करणाऱ्या किंवा न करणाऱ्या अनेकांना स्वत: व्यवसाय Business सुरू करण्याचं स्वप्न असतं. तर अनेक नोकरदारांना नोकरी करत असतानाच उत्पन्न Income वाढवण्यासाठी देखील एखादा बिझनेस करायचा असतो. Try Transportation business for making good Earnings regularly

बिझनेस किंवा व्यवसाय करायची तयारी असली तरी दोन महत्वाचे प्रश्न समोर उभे राहतात. हे प्रश्न म्हणजे बिझनेस करायचा तरी कोणता आणि त्यासाठी लागणारा पैसा. बिझनेसमध्ये Business तोटा तर नाही ना होणार या भितीने अनेकांना कमी गुंतवणूकीत Investment होणारा व्यवसाय करायचा असतो.

यामुळे आता कमी पैशात होणारे व्यवसाय कोणते अशी तारांबळ उघडते. तर आज आम्ही तुम्हाला एक असा व्यवसाय सांगणार आहोत. ज्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही आणि ज्याची गरज मार्केटमध्ये कायम असते.

हा बिझनेस म्हणजे ट्रान्सपोर्ट. टान्सपोर्ट हा कामय चालणारा व्यवसाय आहे. शिवाय गेल्या काही वर्षांमध्ये तर या सेवेची मागणी वाढू लागली आहे. हा एक असा व्यवसाय आहे, ज्यात कमी गुंतवणूक करून तुम्ही जास्त नफा मिळवू शकता.

ट्रान्सपोर्ट म्हणजेच वाहतूक सेवा. यामध्ये विविध प्रकार येतात. म्हणजेच सामानाची किंवा अवजड उपकरणांची वाहतूक Transportation. मात्र, जर तुम्हाला कमी पैशात व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही लोकांसाठी असलेल्या ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरु करू शकता.

भारतात दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. तुमच्या शहरात फिरण्यासाठी येणारे तसंच एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारे असे अनेकजण दररोज प्रवास करत असतात. अलिकडे तर ओला आणि उबर सारख्या अॅपवरूनही कार बोलावून प्रवास करणं हा एक सोपा पर्याय उपलब्ध झालाय.

हे देखिल वाचा-

how to start transport business
केवळ ६ हजारात उभारला ५ कोटींचा Business, संकटांवर केली जिद्दीने मात

एका कार पासून सुरू करा व्यवसाय

जर तुमच्याकडे एखादी चारचाकी असेल तर तुम्ही ती ट्रान्सपोर्टटेशनच्या बिझनेससाठी वापरू शकता. अथवा तुम्ही एखादी नवी किंवा चांगल्या कंडिशनमधील जुनी कारदेखील या व्यवसायासाठी वापरू शकता. ही गाडी तुम्ही स्वत: चालवू शकता किंवा एखाद्या कंपनीला टान्सपोर्ट सेवेसाठी देऊ शकता. यातून चांगली कमाई होते.

कालांतराने तुम्ही दोन किंवा तीन अशा गाड्या वाढवू शकता. मागणी जास्त असल्याने या व्यवसायात तोटा होण्याची शक्यता कमी आहे. कालांतराने तुम्ही गाड्यांची संख्या वाढवून स्वत:ची छोटीशी ट्रान्सपोर्टेशन एजन्सी सुरू करू शकता.

भाड्याने कार घेऊन सुरु करा व्यवसाय

व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला तुमच्याकडे जास्त भांडवल नसल्यास तुम्ही २-३ गाड्या भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू करू शकता. एखाद्या पर्यटन स्थळी किंवा शहरामध्ये टॅक्सी सेवा सुरू केल्यास चांगली कमाई होवू शकते. भाडे तत्वावर गाडी घेताना मात्र कागदपत्र तपासून घ्या.

कालांतराने तुम्ही मिळालेल्या नफ्यातून स्वत:च्या गाड्या खरेदी करू शकता.

मुद्रा योजनेचा घ्या फायदा

मेकइन इंडिया अंतर्गत सरकारने मुद्रा योजना सुरू केली आहे. यामध्ये स्वत:चा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही स्वत:च वाहन खरेदी करू शकता.

हे देखिल वाचा-

how to start transport business
Business Idea : बंपर ऑफर, गोल्ड फिशची शेती करा आणि लाखो रूपये कमवा!

पॅकर्स ऍण्ड मूव्हर्स

पॅकर्स ऍण्ड मूव्हर्स हा देखील ट्रान्सपोर्टेशन बिझनेसचाच एक प्रकार आहे. मुंबई, पुणे आणि अशा अनेक बड्या शहरांमध्ये हजारो लोक कामानिमित्त येत असतात.

अनेकजणांना काही महिन्यांनी किंवा दरवर्षी आपलं राहतं घर बदलावं लागतं. अशा वेळी घरातील सामाना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ट्रक, टेम्पो किंवा लॉरी अशा मोठ्या गाड्यांची त्यांना गरज भासते.

औद्योगिकरण झालेल्या शहरांमध्ये या सेवेची मोठी मागणी आहे. यातून चांगली कमाई देखील होते. यासाठी जरी तुमच्याकडे ट्रक किंवा टेम्पो सारखं मोठं वाहन नसलं तरी तुम्ही सुरुवातील वाहन भाड्याने घेऊन तसचं काही मजुर हाताशी घेऊन शिफ्टींगचा हा बिझनेस करू शकता. या बिझनेसमध्ये मोठा फायदा होवू शकतो.

ट्रान्सपोर्टेशन सेवेतील हे दोन व्यवसाय तुम्ही कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता. शिवाय वाढती गरज पाहता भविष्यातही या सेवेला कायम मागणी राहील, ज्यामुळे यातून मोठा फायदा होवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.