Byju Ravindran: BYJUच्या सीईओला शेअर होल्डर्सनी पदावरुन हटवलं; कंपनीच्या निर्णयांविरोधात केले अनेक आरोप

बैठकीतील निर्णय कर्नाटक हायकोर्टासमोर सादर होणार
ED seeks look-out notice against Byju’s CEO Raveendran
ED seeks look-out notice against Byju’s CEO RaveendranSakal
Updated on

BYJU कंपनीच्या गुंतवणुकदारांची आज विशेष सर्वसाधारण सभा ऑनलाईन प्लॅटफॉर्म झूमवर पार पडली. या सभेत सीईओ बायजू रविंद्रन यांच्याविरोधातील सर्व प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तसेच रविंद्रन यांना सीईओपदावरुन हटवण्यासाठीचा आणि नेतृत्वबदलाचा प्रस्तावही मंजूर झाला आहे. त्यामुळं रविंद्रन यांची पदावरुन गच्छंती होणार हे निश्चित मानलं जात आहे. याशिवाय बायजूजमध्ये गव्हर्नन्स, आर्थिक मिसमॅनेजमेंट आणि तक्रारींशी संबंधित प्रस्ताव मान्य झाले आहेत. (Byju investors vote to oust CEO byju raveendran in hours long zoom call crashed by staff)

ED seeks look-out notice against Byju’s CEO Raveendran
RBI on Paytm Payments Bank: पेटीएमच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; RBIनं दिली मोठी अपडेट

बैठकीतील निर्णय कर्नाटक हायकोर्टासमोर सादर होणार

विशेष सर्वसाधारण सभेत बायजूजच्या संचालक मंडळाच्या पुनर्रचनेच्या शिफारशीचा प्रस्तावही मंजूर झाला आहे. यामुळं कंपनीवर 'थिंक अँड एन्ड लर्न'चं नियंत्रण संपुष्टात येईल. गुंतवणूकदारांनी हे देखील सांगितलं की, त्यांना बैठक आणि त्यातील निर्णयांवर पूर्ण विश्वास आहे. या बैठकीतील निर्णय हे कर्नाटक हायकोर्टासमोर ठेवले जातील. (Marathi Tajya Batmya)

ED seeks look-out notice against Byju’s CEO Raveendran
NCP Symbol Watch Time: राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हात 10 वाजून 10 मिनिटेच का दिसतात? वाचा भन्नाट किस्सा

रविंद्रन यांनी सर्वसाधारण सभेतील प्रस्ताव अमान्य केले असून त्यांचा काहीही परिणाम होणार नाही असंही म्हटलं आहे. कंपनीनं म्हटलं होतं की, विशेष सर्वसाधारण सभेतील प्रस्ताव मान्य करण्यास कंपनी कायदेशीररित्या बाध्य नाही. कंपनीच्या एका प्रवक्त्यानं म्हटलं की, बायजूजच्या घटनेनुसार बैठकीत कमीत कमी एका संस्थापक-संचालकानं सहभाग घेणं बंधनकारक आहे, जर तो नसेल तर या प्रस्तावावांर मतदान घेणं हे बेकायदा आहे. (Latest Maharashtra News)

ED seeks look-out notice against Byju’s CEO Raveendran
India Bloc Mamata Banerjee: इंडिया आघाडीला 'अच्छे दिन'! दिल्ली, गुजरात, युपीनंतर आता ममतांसोबत काँग्रेसची जागा वाटपावर चर्चा

सर्वसाधारण सभेत २० टक्के शेअर धारकांनी घेतला सहभाग

कंपनीच्या म्हणण्यानुसार, कंपनीचे सीईओ बाजयू रविंद्रन यांच्यासह त्यांची पत्नी दिव्या गोकुलनाथ आणि त्यांचे भाऊ रिजू रविंद्रन यांनी बैठकीत सहभाग घेतला नाही. त्यामुळं गुंतवणूकदारांचे निर्णय अमान्य आहेत आणि त्यांनी मांडलेले प्रस्ताव प्रभावहीन आहेत. बायजूजनं हे ही म्हटलंय की, सभेत केवळ २० टक्के शेअरधारकांनी सहभाग नोंदवला. याशिवाय बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर बोर्ड विचार करु शकतो, त्यांचा निर्णय मानण्यास बोर्ड बांधील नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()