New Rules: 1 एप्रिलपासून पॅन, डेबिट कार्डसह 'या' नियमांमध्ये बदल, सर्वसामान्यांवर थेट परिणाम

SBI Debit Card: या बदलांमध्ये पॅन आधार लिंकिंग, नॅशनल पेन्शन सिस्टम, ईपीएफओशी संबंधित नियमांचा समावेश आहे.
New Rules April 2024
New Rules April 2024Esakal
Updated on

News Rules From 1st April:

1 एप्रिल 2024 म्हणजेच आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2024-2025 सुरू होत आहे. यानंतर देशातील विविध क्षेत्रांमधील अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. ज्याचा सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यावर थेठ परिणाम होणार आहे.

या बदलांमध्ये पॅन आधार लिंकिंग, नॅशनल पेन्शन सिस्टम, कर, पीएफ संबंधित नियमांचा समावेश आहे.

पॅन-आधार लिंक

पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पॅनला कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2024 पर्यंत होती.

जर दिलेल्या मुदतीत पॅन आधार कार्डशी लिंक नसेल तर पॅन क्रमांक रद्द होईल. म्हणजेच पॅन कार्डचा कागदपत्र म्हणून वापर करता येणार नाही.

जर 1 एप्रिलनंतर पॅन कार्ड आधारशी लिंक करायचे असल्यास, 1,000 रुपये दंड भरावा लागणार आहे.

SBI डेबिट कार्डचे नवीन नियम

एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने काही डेबिट कार्डशी संबंधित वार्षिक देखभाल शुल्कात (Maintenance Charges) 75 रुपयांची वाढ केली आहे. हा बदल 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल.

दुसरीकडे एसबीआय कार्ड्सने जाहीर केले आहे की, 1 एप्रिल 2024 पासून काही क्रेडिट कार्डांसाठी भाडे भरणा व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स बंद होणार आहेत.

यामध्ये AURUM, SBI Card Elite, SBI Card Elite Advantage, SBI कार्ड पल्स आणि SimplyClick SBI कार्ड यांचा समावेश आहे.

New Rules April 2024
AI : घरबसल्या मिळवा हक्काच्या योजनांचा लाभ, आता AI देणार सरकारी योजनांची माहिती

नवीन कर प्रणाली (Tax Regime)

जर करदात्याने 31 मार्चपर्यंत नवी कर प्रणाली (Tax Regime) निवडली नसेल, तर 1 एप्रिल, 2024 पासून, त्याची नवीन कर प्रणाली डीफॉल्ट कर प्रणाली बनेल. म्हणजेच नवीन करप्रणालीच्या नियमांनुसार करदात्याला कर भरावा लागेल.

विमा पॉलिसीमध्ये श्रेणीबद्ध सरेंडर मूल्याचा प्रस्ताव

विमा पॉलिसींमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 1 एप्रिल 2024 पासून नवीन नियम लागू होतील. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने नियमांमधील बदलांंतर्गत वेळेनुसार श्रेणीबद्ध सरेंडर मूल्य प्रस्तावित केले आहे.

नवीन नियमांनुसार, पॉलिसीधारकाने तीन वर्षांच्या आत पॉलिसी सरेंडर केल्यास, सरेंडर मूल्य समान किंवा कमी असेल, तर पॉलिसीधारकाने 4 थ्या आणि 7 व्या वर्षाच्या दरम्यान विमा सरेंडर केल्यास, त्याचे मूल्य जास्त असू शकते.

New Rules April 2024
Share Market Today: सलग तेजीनंतर बाजारात आज काय होणार? हे 10 शेअर्स ठरतील लक्षवेधी

एनपीएस नियमांमध्ये बदल

पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) ने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अधिक सुरक्षित करण्यासाठी आधार आधारित Two Factor Authentication सिस्‍टम सुरू केली आहे. ही प्रणाली सर्व पासवर्ड बेस एनपीएस युजर्ससाठी असेल, जी 1 एप्रिलपासून लागू केली झाली आहे. पीएफआरडीएने १५ मार्च रोजी याबाबतची अधिसूचना जारी केली होती.

EPFO

1 एप्रिल 2024 पासून ईपीएफओचे नियम बदलले आहेत. या नियमानुसार आता नोकरी बदलल्यानंतर पीएफ खाते ऑटो मोडमध्ये ट्रान्सफर केले जाईल. म्हणजेच आता युजरला अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी रिक्वेस्ट देण्याची गरज भासणार नाही. हा नियम लागू झाल्याने कर्मचाऱ्यांच्या अडचणी काही प्रमाणात कमी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.