जगभरात हवामान बदलाचे अनेक परिणाम आता जाणवत आहेत. तापमानातील अतिवाढ, पावसाचे बिघडलेले वेळापत्रक, अतिपाऊस, पूर, भूकंप, भूस्खलन, हवेतील बदल असे कितीतरी परिणाम दिसत आहेत. भूजलाचा साठा संपत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे निसर्गाची हानी रोखली नाही, तर आपले जीवन किती कष्टप्रद होणार आहे, याची जाणीव मानवाला होऊ लागली आहे. निसर्ग वाचवायचा असेल, तर उपभोगतावाद, चंगळवाद रोखण्याची गरज आहे.