नवी दिल्ली : चीनमधील कायद्यांनुसार क्रिप्टोकरन्सी देशात कायदेशीर असल्याचा निर्वाळा शांघाय कोर्टानं दिला आहे. दरम्यान, चीनमध्ये बिटकॉइनचा भाव चांगलाच वधारला आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये मालमत्तेचे गुणधर्म असतात त्यामुळं या आभासी चलनाचा व्यवहार कायदेशीर आहे, असं कोर्टानं म्हटलं आहे.