Crypto Transaction : सरकारने क्रिप्टोकरन्सी भोवतीचे फास आवळले; लागू होणार मनी लाँड्रिंगचे नियम

भारताचे मनी लाँडरिंग कायदे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यापार करण्यासाठी देखील लागू
Crypto Transaction
Crypto Transactionesakal
Updated on

Crypto Transaction : भारताचे मनी लाँडरिंग कायदे आता क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यापार करण्यासाठी देखील लागू होतील. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने 7 मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत हे सांगितलं आहे. अधिसूचनेमध्ये असं म्हटलंय की क्रिप्टोकरन्सी मालमत्ता आणि फियाट चलन यांच्यातील देवाणघेवाण, क्रिप्टोकरन्सी मालमत्तेच्या एक किंवा अधिक प्रकारांमधील देवाणघेवाण आणि डिजिटल मालमत्तेचे हस्तांतरण मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्यांतर्गत समाविष्ट केले जाईल.

Crypto Transaction
Technology Tips : दुष्काळात तेरावा महिना! गुगलने कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर आता प्रमोशन थांबवले

अधिसूचनेमध्ये पुढे म्हटलंय की आभासी क्रिप्टोकरन्सी मालमत्ता धारण करणे किंवा वापरणे आणि क्रिप्टोकरन्सी मालमत्तांच्या ऑफर आणि विक्रीशी संबंधित वित्तीय सेवांमध्ये सहभाग देखील या अंतर्गत समाविष्ट केला जाईल.

Crypto Transaction
Technology Tips : Alexa आणि Google Home तुमचं 'सिक्रेट' रेकॉर्ड करू शकतात, असा डिलिट करा डेटा

अहवालानुसार, भारतात क्रिप्टोकरन्सीशी संबंधित विधेयक आणि नियम अद्याप निश्चित झालेले नाहीत. तथापि, भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या वापराबाबत अनेक वेळा लोकांना इशारा दिला आहे. आरबीआयने म्हटलंय की क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली पाहिजे कारण ती बनावट योजनेसारखीच आहे. क्रिप्टोकरन्सीवर मनी लाँडरिंग नियम लागू झाल्यानंतर, प्रशासन देशाच्या सीमेबाहेर या मालमत्तेच्या हस्तांतरणावर लक्ष ठेवण्यास सक्षम असेल.

Crypto Transaction
Technology Tips : Alexa आणि Google Home तुमचं 'सिक्रेट' रेकॉर्ड करू शकतात, असा डिलिट करा डेटा

पण हे क्रिप्टोकरन्सी हा नेमका प्रकार काय आहे?

तर क्रिप्टोकरन्सी ही संकल्पना आता जवळपास दशकभर जुनी झाली आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, हे बहुतेकांना माहीत असेलच. आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता.

Crypto Transaction
Tiago, Tigor, Safari : स्वस्तात खरेदी करा टाटा कार्स, 65000 पर्यंत सूट

२००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या. अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही.

Crypto Transaction
Jio 5G : या नव्या शहरात Jio ची 5G सेवा सुरू, तुमच्या शहराचा समावेश आहे का?

कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे.

Crypto Transaction
National Health Mission : वैद्यकीय सेवा सक्षम करण्यासाठी शहरात 106 उपकेंद्र

अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातूनच या आभासी चलनांचे विनिमय बाजार उभे राहिले. या बाजारांत जगभरातील आभासी चलनांचे भौतिक चलनांच्या तुलनेतील मूल्य दररोज ठरते. ‘बिटकॉइन’ या आद्य आभासी चलनाचे मूल्य तर आकाशाला गवसणी घालत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()