एखादा धंदा उत्तम आहे की नाही, हे ठरविण्यासाठी काही निकष लावता येतील. माझ्या मते, ज्या धंद्यात ग्राहक ‘ॲडव्हान्स’ रक्कम देतात, तो धंदा उत्तम म्हणावयास हरकत नाही.
उत्पादनाचे वेगळेपण, किंमत, दर्जा, जलद सेवा आणि तंत्रज्ञान यामुळे ग्राहक ‘ॲडव्हान्स’ देऊन उत्पादन किंवा सेवा घेण्यासाठी तयार असतात.
असा धंदा नक्कीच उत्तम आहे, असे म्हणता येईल. ग्राहक एका ठराविक उत्पादनाच्या खरेदीसाठी एका ठराविक कंपनीलाच प्राधान्य देतात, तेव्हा त्या उत्पादनाच्या क्षेत्रात त्या कंपनीचे वर्चस्व निर्माण होते. ही स्थिती गाठणे अवघड असते, पण कठीण नसते.
यासाठी संशोधन, तपश्चर्या लागते, जो हे करू शकतो त्याला आपल्या धंद्यात उत्तम जम बसवणे, प्रगती करणे शक्य होते. ग्राहक रांग लावून वस्तू खरेदी करतात, पुन्हा पुन्हा वस्तूखरेदीसाठी एकाच ठिकाणी येतात.