Online Fraud : सणासुदीच्या काळात ग्राहक अधिक प्रमाणात खरेदी करतात, पण फसवणूक करणारे देखील आर्थिक घोटाळे करत ग्राहकांची फसवणूक करतात. उदयास येत असलेले डिजिटल पेमेंट घोटाळे सावधगिरी बाळगणाऱ्या वापरकर्त्यांची देखील फसवणूक करू शकतात. नियामक सर्वांसाठी डिजिटल पेमेंट्स सुरक्षित करण्याकरिता e- BAAT आणि RBI Kehta Hai यांसारखे उपक्रम राबवत जागरूकतेचा प्रसार करत आहे. पण, असे असूनही फसवणूक झाली तर काय करावे? तुमची फसवणूक झाली असेल तर धोका कमी करण्यासाठी सक्रियपणे कार्य करत #SatarkNagrik बनण्याकरिता व्हिसा पाच प्रभावी टिप्स सांगत आहेत.