नवी दिल्ली : ईशा अंबानी या मुकेश अंबानींच्या कन्या असून सध्या त्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी नुकतेच एका ऑनलाईन कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटलं की, भारताच्या चमकदार कामगिरीसाठी अधिकाधिक मुलींनी STEM (Science, Technology, Engeering, Mathematics) मध्ये काम करायला हवं. तंत्रज्ञानाला मुलींना करिअर म्हणून निवडायला हवं, असंही ईशा अंबानी यांनी म्हटलं आहे. (For India to shine more and more girls must take up STEM says Isha Ambani)
'गर्ल्स इन इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजी डे (ICT) इंडिया 2024' च्या कार्यक्रमाला संबोधित करताना त्या म्हणाल्या, "जर तुम्हाला आपल्या स्वप्नातील भारत घडवायचा असेल, तर तंत्रज्ञान ही आपली शक्ती असेल आणि स्त्री आणि पुरुष दोघेही विज्ञान आणि तंत्रज्ञानानं सर्व स्वार झालं पाहिजे. तंत्रज्ञान उद्योगाच्या सतत विकसित होत असलेल्या क्षेत्रांमध्ये, कामगारांमध्ये महिलांचे कमी प्रतिनिधित्व हे एक वास्तव आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
लिंगभेद हे केवळ लिंगभेद नाही, तर नवनिर्मितीच्या मार्गातील एक अडथळा देखील असल्याचं ईशा अंबानी यांनी म्हटलं आहे. ही विभागणी बंद करणं एक धोरणात्मक गरज असून ती उद्योगाच्या तसेच समाजाच्या सर्वांगीण वाढीसाठी आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं.
भारतातील टेक कर्मचाऱ्यांमध्ये स्त्रियांचं प्रमाण 36 टक्के आहे, परंतु कॉर्पोरेटमध्ये उच्चपदस्थ शोधायला गेल्यास ती खूपच कमी आहे. उदाहरणार्थ, केवळ 7 टक्के स्त्रिया कार्यकारी-स्तरीय पदं भूषवतात. तर केवळ 13 टक्के नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये काम करतात. तर 17 टक्के महिला मध्य-व्यवस्थापकीय पदांवर कार्यरत आहेत.
NASSCOM डेटाचा हवाला देऊन, ईशा अंबानी म्हणाली की, भारतातील तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांपैकी केवळ 36 टक्के महिला आहेत. जागतिक बँकेच्या आकडेवारीचा हवाला देऊन त्या म्हणाल्या की, भारतातील एकूण STEM पदवीधरांपैकी स्त्रिया 43 टक्के आहेत. पण सर्व शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञांमध्ये त्यांचा वाटा फक्त 14 टक्के आहे, असंही यावेळी ईशा अंबानी यांनी सांगितलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.