Budget 2024 Health: गर्भाशय कॅन्सरसाठी ९ ते १४ वयाच्या मुलींना मोफत लसीकरण, बजेट मध्ये मोठी घोषणा!

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अंतरित अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच सरकारने केलेल्या कामांच्या लेखाजोखा मांडला.
Budget 2024 Health
Budget 2024 Healthesakal
Updated on

नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अंतरित अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच सरकारने केलेल्या कामांच्या लेखाजोखा मांडला. त्या म्हणाल्या की, महिला, मुलींच्या लसीकरणावर भर देण्यात आला आहे. गर्भाशय कॅन्सर लसीकरणासाठी ९ ते १४ वयागटातील मुलींचे मोफत लसीकरण केले जात आहे. मुलांच्या संगोपणासाठी आणि गरोदर मातेसाठीच्या अनेक योजना एका छत्राखाली आणण्यात आल्या आहेत.

आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आता सर्व आशासेविका आणि अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. ८० कोटी जनतेला मोफत राशन वाटप करण्यात येत आहे. महिलांची उद्योजगता २८ टक्कांनी वाढली आहे. लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. महिलांच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सीतारमण म्हणाल्या. (nirmala sitharaman budget 2024)

Budget 2024 Health
Budget 2024: 2019च्या अंतरिम अर्थसंकल्पात 'या' 5 मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या; यावेळीही होणार...

लखपती दीदी योजने अंतर्गत ८३ लाख छोट्या व्यवसायातून ९ कोटी महिला ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावत आहेत. महिला सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरपणा त्यामुळे शक्य झाले आहे. या योजनेमुळे १ कोटी महिला लखपती झाल्या आहेत. त्या दुसऱ्यांसाठी प्रेरणा ठरत आहेत. त्यामुळे आता योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून ३ कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचे आता लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असं सीतारमण म्हणाल्या.

Budget 2024 Health
Budget 2024 Railway: 40 हजार रेल्वे बोगी 'वंदे भारत'मध्ये बदलणार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

पीएम आवास योजनेतून ३ कोटी घरे बांधण्यात आली आहेत. ७० टक्के घरे पीएम आवास योजनेंतर्गत ग्रामीण महिलांना मिळाले आहेत. पुढच्या ५ वर्षात २ कोटी घरे निर्माण करण्यात येईल. प्रत्येकाला घर मिळावे यासाठी मोदी सरकार प्रतिबद्ध आहे. दूध उत्पादन शेतकऱ्यांनी नवी योजना सुरु करण्यात आली आहे. किसान संपदा योजनेतून ३८ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. स्वंयरोजगारासाठी ३४ लाख कोटींचे कर्ज देण्यात आले आहे, असं त्या म्हणाल्या. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.