Gold Rate: सोने-चांदी तोडणार सर्व रिकॉर्ड? इराण ठरणार कारणीभूत; जाणून घ्या भाव

Gold silver Rate Today: इराणच्या अध्यक्षांच्या मृत्यूमुळे मध्य-पूर्वी आशियामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
Gold silver Rate
Gold silver Rate
Updated on

नवी दिल्ली- इराणच्या अध्यक्षांच्या मृत्यूमुळे मध्य-पूर्वी आशियामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव विक्रमी ठरले. सोमवारी बाजार बंद होईपर्यंत एमसीएक्सवर सोने 74394 वर बंद झाला, तर चांदीची कालची किंमत 95480 रुपये होती.

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे मध्य पूर्व आशियात अनिश्चितता आणि अस्थिरतेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, जगात अनिश्चितता वाढली की सोन्याचे भाव वाढतात. कारण, गुंतवणूकदार सर्वात आधी सोन्याला पसंती देतात.

Gold silver Rate
Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

सोने आणि चांदीच्या किंमती वाढल्या आहेत, पण इंधानाच्या दरामध्ये देखील वाढ झाली आहे. इराण हा महत्त्वाचा क्रूड ऑईल पुरवणारा देश आहे. इराणच्या ऑईल उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रति बॅरल ऑईलचे भाव वाढू शकतात. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या भाव 74,411 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा भाव 93,215 रुपये किलो इतका झाला आहे.

Gold silver Rate
शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक! आमिषाला बळी पडलेल्यांनी ‘या’ क्रमांकावर करावा कॉल; हडप झालेली रक्कम परत मिळेल

सोन्यातील किंमतीच्या वाढीमधील आणखी एक कारण म्हणजे अमेरिकेतील चलनवाढीमधील नरमाई. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने आपल्या व्याज दरात घट करण्याचे सूतोवाच केले आहेत. गेल्या बुधवारी अमेरिकेत महागाई संदर्भात एप्रिलमधील आकडे समोर आले आहेत. हे आकडे सकारात्मक आहेत. त्यामुळेच सोन्याच्या किंमतीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने सप्टेंबरमध्ये दरात घट करण्याचे संकेत दिल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यावर दाव खेळला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com