कायनात चैनवाला
सोन्याचा भाव सध्या ‘दिन दुनी रात चौगुनी’ या वेगाने वाढत आहेत. त्यामुळे यंदा सणासुदीच्या हंगामात सोन्यातील गुंतवणूक अधिक आकर्षक पर्याय ठरत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सोन्याचा भाव प्रतिऔंस २,७५८.४२ डॉलरवर पोहोचला. सोन्याचा हा आतापर्यंतचा उच्चांकी भाव ठरला आहे. डिसेंबरसाठी ‘एमसीएक्स’मध्ये सोन्याचा वायदा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ७८ हजार ९१९ रुपयांवर पोहोचला आहे. संवत २०८० पासून जागतिक पातळीवर सोन्याच्या भावामध्ये ४१ टक्के वाढ झाली आहे, तर ‘एमसीएक्स’वरील किमतींमध्ये २७ टक्के वाढ झालेली आहे.जागतिक पातळीवर तणावाची स्थिती आणि मध्यवर्ती बँकांच्या धोरणांमुळे सोन्याच्या भावात ही तीव्र वाढ दिसत आहे.