Government company NBCC India : तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला स्टॉक शोधत असाल तर एनबीसीसी इंडिया लिमिटेडच्या (NBCC (India) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. या सरकारी बांधकाम कंपनीने अलीकडेच मजबूत आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. .कंपनीच्या ऑर्डर बुकने 30 जून 2024 पर्यंत 81000 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. हा शेअर सध्या 89.96 रुपयांवर ट्रेड करत आहे. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप 24,289 कोटी झाले आहे.सप्टेंबर तिमाहीत एनबीसीसी लिमिटेडचा नफा आणि महसूल दोन्ही वाढले आहेत. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक 52.8 टक्क्यांनी वाढून 125.1 कोटी झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हा आकडा 81.9 कोटी होता. या कालावधीत महसूल 19.4 टक्क्यांनी वाढून 2,458.7 कोटीवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत 2,085.5 कोटी होता..कंपनीने अलीकडेच अनेक महत्त्वाच्या ऑर्डर्स मिळवल्या आहेत. यामध्ये नवी दिल्लीतील गेल (इंडिया) लिमिटेडच्या कार्यालयाच्या जागेसाठी 50 कोटीचा इंटिरियर फिट-आउट प्रोजेक्ट, मुंबईतील न्यू इंडिया इश्युरन्स बिल्डिंगसाठी 136 कोटीची ऑर्डर आणि कानपूरमधील सरकारी संकुलाच्या बांधकाम प्रोजेक्टसाठी 262.74 कोटीच्या ऑर्डरचा समावेश आहे. या प्रोजेक्ट्सची एकूण किंमत 448.74 कोटी आहे..गेल्या एका महिन्यात एनबीसीसीचे शेअर्स 20 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या 6 महिन्यांत फ्लॅट परतावा दिला आहे. मात्र, या वर्षी आतापर्यंत कंपनीचे शेअर्स 65 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या एका वर्षात याने 98 टक्के इतका जोरदार परतावा दिला आहे. इतकेच नाही तर गेल्या 4 वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांना 423 टक्के इतका मजबूत परतावा मिळाला आहे..नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.