Hindenburg Post: कुछ तो बड़ा होने वाला है! आता कुणाचा नंबर? हिंडेनबर्गची खळबळजनक पोस्ट व्हायरल

Gautam Adani: गौतम अदानी यांच्या कंपन्यांवर आरोप करणारी अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण हिंडेनबर्गने एक्सवर एक पोस्ट केल्यानंतर खळबळ उडाली आहे.
Hindeberg X Post
Hindeberg X PostEsakal
Updated on

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांवर आरोप करणारी अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण हिंडेनबर्गने एक्सवर एक पोस्ट केल्यानंतर खळबळ उडाली आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चच्या या पोस्टमध्ये ‘समथिंग बिग सून इंडिया’ असे लिहिण्यात आले आहे. त्यांच्या या पोस्टचा असा अर्थ होतो की, ते लवकरच काही भारतीय कंपनीबद्दल काही मोठी माहिती उघड करणार आहेत. अशा स्थितीत हिंडेनबर्ग रिसर्च यावेळी कोणत्या कंपनीबाबत खुलासा करणार याकडे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जेव्हा हिंडेनबर्ग रिसर्चने गौतम अदानी यांच्या समूहावर आरोप केले होते तेव्हा अदानी समूहाचे शेअर्स कोसळले होते.

हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केला होता की गौतम अदानी यांच्या समूहाने त्यांच्या खात्यांमध्ये फेरफार करून शेल कंपन्या तयार करून पैसे मिळवले.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सेबीकडून चौकशी केल्यानंतर हिंडेनबर्गचे आरोप खोटे निघाले होते. अदानी समूहाने कोणतेही गैरप्रकार केले नसल्याचे सेबीच्या तपासात समोर आले आहे.

हिंडेनबर्ग रिसर्चच्या दाव्यानंतर गौतम अदानी हे जगातील पहिल्या दहा श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आणि त्यांची एकूण संपत्तीही कमालीची घसरली होती.

सेबीचा अहवाल आल्यानंतर गुंतवणूकदारांनी पुन्हा अदानी समूहावर विश्वास दाखवला. त्यामुळे गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स पुन्हा चांगले प्रदर्शन करू लागले.

Hindeberg X Post
Bonus Shares : 'या' स्टॉकची एका वर्षात 142% वाढ, आज बोनस शेअर्सबाबत निर्णय...

हिंडेनबर्गमुळे अदानी समूहाचे नुकसान

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये हिंडेनबर्ग रिसर्चने एक अहवाल प्रसिद्ध केला होता, ज्यामध्ये अदानी समूहाच्या आर्थिक स्थितीची माहिती देताना समूहावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. ज्यामध्ये शेअरच्या किमतीत फेरफार करण्यासारख्या अनेक गंभीर आरोपांचा समावेश होता.

Hindeberg X Post
SIP Investment : ‘एसआयपी’ गुंतवणूक विक्रमी २३ हजार कोटींवर; जुलैमध्ये गुंतवणुकीत १० टक्के वाढ; इक्विटी फंडातील ओघ आटला

अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर, अदानी समूहाच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली आणि अदानी समूहाच्या बाजार मूल्यात 86 अब्ज डॉलर्सची मोठी घसरण नोंदवली गेली.

मात्र, अदानी समूहाने हिंडेनबर्ग संशोधन अहवाल फेटाळत समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग प्रकरण अदानी समूहाची बदनामी करण्याच्या उद्देशाने रचण्यात आल्याचे म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.