अॅड. मंगेश नेने
प्राप्तिकर कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न वेगवेगळ्या प्रकाराखाली करपात्र होते. त्यातील एक म्हणजे भांडवली नफ्यापासूनचे उत्पन्न. आता भांडवली नफा म्हणजे कोणतीही भांडवली मालमत्ता विक्री झाल्यावर मिळणारा नफा.
त्यासाठी प्रथम भांडवली मालमत्ता म्हणजे काय हे बघणे आवश्यक आहे. भांडवली मालमत्तेमध्ये प्राप्तिकर कायदा कलम २(१४)नुसार जमीन, घर, सोने, शेअर, रोखे, काही म्युच्युअल फंड आदी. आपण घराची विक्री व त्यावरील मिळणाऱ्या नफ्यावरील करदायित्व यावर चर्चा करणार आहोत.
त्याचबरोबर येणारा भांडवली लाभ कर (कॅपिटल गेन टॅक्स), दीर्घकालीन नफा असेल तर काही विशिष्ट गुंतवणूक करून कसा वाचवता येतो, हे देखील पाहणार आहोत.