India Vs US Economy: 2024 मधील आर्थिक परिस्थितीची तुलना केल्यास काय दिसते?

India Economy Analysis भारताचा एकंदर आर्थिक विकास वर्ष २३ व वर्ष २४ मध्ये जगभरात सर्वोत्कृष्ट राहिला असून, जीडीपीमध्ये ६.५ ते ७ टक्के वाढ झाली आहे. त्याचे प्रतिबिंब उत्पादन व सेवा क्षेत्रांत नोकऱ्यांच्या संधी वाढण्यात दिसून येत आहे. घरे, रस्ते, विमानतळ व व्यावसायिक रचनांच्या बांधकामांतच प्रचंड वाढ दिसत आहे.
India, USA, Economy, Sakal Money
India Vs USA EconomySakal Money
Updated on

प्रा. किशोर कुलकर्णी kulkarnk@msudenver.edu

अमेरिकेत आणि भारतात यंदा म्हणजे २०२४ या वर्षात जी बृहद् आर्थिक स्थिती दिसून आली, त्या दोन्ही चित्रांची तुलना करुन आर्थिक प्रवाहांचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण या लेखात करणार आहोत. हे लेखन करताना मला आनंद वाटतोय कारण मी अमेरिकेतील विद्यापीठांत गेली ४४ वर्षे प्रामुख्याने बृहद्अर्थशास्त्र (मॅक्रोइकॉनॉमिक्स) अभ्यासक्रम शिकवत आलो असल्याने अमेरिकेतील आर्थिक बदल जवळून बघतोय. दुसरीकडे माझी पार्श्वभूमी पुण्याची असून, मी अर्थशास्त्रातील शिक्षण पुणे विद्यापीठांतर्गत घेतले आहे. मी बीए (एजी कॉलेज) आणि एमए (गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स) या पदव्या घेतल्यानंतर अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पीट्सबर्ग येथून एमए व पीएचडी या पदव्या घेतल्या. त्यामुळे मी गेल्या ५० हून अधिक वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्थेचेही निरीक्षण करत आलो आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.