Car Insurance Tips: पावसाळ्यात अनेकदा मुसळधार पावसामुळे किंवा काहीवेळेस पुरामुळे रस्त्यांवर किंवा इमारतींच्या पार्किंग लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरतं. अशा वेळी पार्क केलेल्या गाड्यांचं मोठं नुकसान होवू शकतं. तसचं अनेकदा पुरामुळे Floods देखील गाड्यांचं मोठं नुकसान होतं. Save your car in monsoon rains or water by adding ad on insurance cover
पुरामुळे कारचं झालेलं नुकसान इन्श्युरन्स कंपनीकडून Insurance Company मिळेल का असा प्रश्न अनेकांना पडतो? खरं तर अनेक Car Insurance कंपन्या या पावसामुळे Rains किंवा पुरामुळे झालेलं कारची नुकसान कव्हर करतात.
मात्र हे तुम्ही कोणती पॉलिसी घेत आहात यावर पूर्णपणे अवलंबून असतं. म्हणेजच कारचा विमा काढताना तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घेऊन योग्य विमा घेणं गरजेचं आहे.
जर तुमच्या विम्यामध्ये कव्हर अॅड असेल तरच विमा कंपनीकडून तुम्हाला लाभ मिळू शकतो. बहुतांश कार इन्श्युरन्स कंपन्या या पूर, भूकंप, चक्रिवादळ तसचं इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये कारचं झालेलं नुकसान कव्हर करतात. अर्थात यासाठी तुम्हाला विमा घेताना ऍड-ऑन सर्विसेस घ्याव्या लागतील.
ऍड-ऑन सर्विसेस घेण्यासाठी तुम्हाला थोडे जादा पैसे मोजावे लागतील. मात्र यामुळे पुरामध्ये कारचं होणारं नुकसान होणार नाही.
पुरामुळे कारचं होऊ शकतं असं नुकसान
पावसाचं किंवा पुराचं पाणी कारमध्ये शिरल्यास इलेक्ट्रिकल कंपोनंट्समध्ये शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो. यामुळे कारचा एखादा महागडा पार्ट खराब होवू शकतो.
पुराचं पाणी इंजिनमध्ये शिरल्यास इंजनच्या आतील भागाचं नुकसना होवू शकतं किंवा संपूर्ण इंजनही निकामी होवू शकतं.
गियरबॉक्समध्ये पाणी गेल्यास युनिटमध्ये काही प्रमाणात किंवा पूर्णत: बिघाड निर्माण होवू शकतो. तसंच गियरबॉक्समध्ये बिघाड झाल्यास त्यासाठी मोठा खर्च करावा लागू शकतो.
तसचं गाडीमध्ये पाणी शिरल्याने किंवा कार अनेक तास किंवा दिवस पाण्यामध्ये राहिल्यास गाडीत मोठा बिघाड होण्यासोबतच गाड्याचं इंटेरियर म्हणजेच सीट, मॅट, साउंड सिस्टम खराब होवू शकतात.
हे देखिल वाचा-
ऍड-ऑन कार इन्श्युरन्सचे फायदे
इंजिन सुरक्षा कव्हर- पुरस्थितीमध्ये कारमध्ये पाणी शिरल्याने इंजिनमध्ये बिघाड होण्याची मोठी शक्यता असते. साधारण विम्यामध्ये इंजिनचं झालेल्या नुकसानासाठी कोणतही कव्हर दिलं जात नाही. मात्र जर तुम्ही ऍड-ऑन सर्विस घेतली असेल तर इंजिनची दुरुस्ती किंवा संपूर्ण इंजिन तुम्हाला रिप्लेस करून मिळू शकतं.
इनवॉइस कवर- जर पुराच्या पाण्यामुळे तुमच्या कारच फारच जास्त नुकसान झालं असेल किंवा कार चोरीला गेली असेल तर अशा वेळी तुम्ही इन्शुरंस कंपनीकडे कारच्या संपूर्ण किमतीसाठी क्लेम करू शकता. अर्थात यासाठी तुमच्याकडे रिटर्न टू इनवॉइस कव्हर असणं गरजेचं आहे.
Key रिप्लेसमेंट कव्हर- अलिकडे सर्व नव्या कारमध्ये सेंट्रल लॉकिंग सिस्टम देण्यात येते. कारमध्ये पाणी शिरल्याने ही सिस्टिम खराब होवू शकते. मात्र जर तुमच्याकडे Key रिप्लेसमेंट कव्हर असेल तर तुम्हाला चावी किंवा बिघडलेल्या लॉकसेटची दुरुस्ती करुन मिळते किंवा संपूर्ण लॉकसेट रिप्लेस करून मिळतो. यासाठी हे ऍड ऑन घेणं गरजेचं आहे.
अशा प्रकारे पावसाळ्यात पुरामुळे कारचं नुकसान झाल्यास किंवा मोठा बिघाड झाल्यास तुम्हाला खर्च वाचवायचा असेल तर तुम्ही विमा खरेदी करत असताना विविध ऍड-ऑन सर्विसेसची माहिती घेऊन त्याचा देखील विम्यामध्ये समावेश करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.