Interim Budget 2024: निर्मला सीतारमण यांच्या अंतरिम अर्थसंकल्पातून देशाला काय आहेत अपेक्षा? जाणून घ्या

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असून याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. सीतारमण २०२४-२४ या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर करतील.
Interim Budget 2024
Interim Budget 2024
Updated on

नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार असून याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. सीतारमण २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प आज सादर करतील. लोकसभा निवणुकीआधी सादर होणाऱ्या या बजेटमध्ये मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र, देशातील सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पातून काय अपेक्षा आहेत हे आपण पाहूया.

Interim Budget 2024
Budget 2024: 2019च्या अंतरिम अर्थसंकल्पात 'या' 5 मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या; यावेळीही होणार...

१. गेल्या वर्षी पडलेल्या कमी पावसामुळे त्याचा परिणाम पिकाच्या उत्पादनावर पडला आहे. शिवाय मागील वर्षाच्या मध्यात सरकारने महत्वांच्या पिकांच्या निर्यातीवर बंदी आणली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसंबंधीच्या योजनांना अधिक बुस्ट मिळणे आवश्यक आहे. तसेच खत, घरगुती गॅस सिलिंडर यांमध्ये सबसिडी मिळणे गरजेचं आहे.

२. बेरोजगारी हा गंभीर मुद्दा बनत चालला आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीवर भर देणे आवश्यक आहे.

३. सरकारने पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जेणेकरुन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. सरकार रस्ते, रेल्वे, डिजिटल प्रकल्प यामध्ये अधिक गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

४. वित्तीय तूट नियंत्रणात ठेवणे आवश्यक बनले आहे. आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत सरकारने वित्तीय तूट ४.५ टक्यांपर्यंत ठेवण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यामुळे खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसवावा लागणार आहे.

५. देशात महागाई वाढली आहे. त्यामुळे करदात्यांनी काहीच्या दिलाशाच्या अपेक्षा केली आहे. कर स्लॅब कमीच राहण्याची शक्यता आहे.

६. सरकार अनौपचारिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा निधी सुरु करण्याची शक्यता आहे. सर्वसमावेशक वाढीसाठी सरकार प्रयत्नशील आहे.

६. कमी किंमतीतील घरांची मागणी वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कमी पैशात घर खरेदी करता यावे यासाठी सरकार अशा योजनांमध्ये पैसा ओतण्याची शक्यता आहे

Interim Budget 2024
2024 Budget : 'बजेट'च्या दिवशीच सर्वसामान्यांना झटका, गॅसचे दर वाढले

७. करदात्यांवर भार न देता निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून सरकार पैसे उभा करण्याच्या तयारीत आहे.

८. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील दिसून येत आहे. घरगुती गॅसमध्ये सबसिडीची घोषणा केली जाऊ शकते. कर्ज घेण्यासाठी महिलांना प्रोत्साहित केले जाऊ शकते.

९. जग हरित उर्जेकडे वळत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात ग्रीन हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहने यासाठी निधी दिला जाण्याची अपेक्षा आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.