How to check Bank Balance: महिन्याचे पहिले 15 दिवस म्हणजे मजा असते, सगळ्यांची सॅलरी येण्याची, पेन्शनची वेळ असते त्यामुळे सतत बँकेत पैसे आले का याचा रिपोर्ट घ्यावा लागतो. पण यासाठी बँकेत जायची गरज नाही आपण आपला बँक बॅलन्स कसा चेक करायचा? how to check account balance in sbi by sms
अशात तुम्ही फोन वर एक मिस कॉल Miss Call देऊन सुद्धा आपला बॅलन्स चेक करु शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या युजर्ससाठी त्यांच्या खात्यातील बॅलन्स तपासण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही ऑनलाइन Online पद्धतीने सुद्धा चेक करु शकतात आणि अॅप किंवा वेबसाइटद्वारे SBI खात्यातील बॅलन्स तपासू शकता.
शिवाय बॅलन्स तपासण्यासाठी तुम्ही मिस्ड कॉल, एसएमएस आणि एटीएम हे ऑप्शन निवडू शकता. अशा प्रकारे तुम्ही बँकेतील लांबलचक रांग टाळू शकता.
तुम्हाला अजूनही तुमच्या SBI खात्यातील बॅलन्स ऑनलाइन कसा तपासायचा हे माहित नसेल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला मिस्ड कॉल आणि एसएमएसद्वारे बॅलन्स तपासण्याचे सोपे मार्ग सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.
हे देखिल वाचा-
मिस्ड कॉलद्वारे SBI खात्यातील शिल्लक कशी तपासायची?
मिस्ड कॉलद्वारे तुम्ही तुमच्या SBI खात्यातील शिल्लक तपासू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरुन तुमच्या बँक नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. तुम्ही मिस्ड कॉल सुविधेसह तुमच्या खात्यातील शिल्लक तसेच मिनी स्टेटमेंट देखील तपासू शकता.
बॅलन्स तपासण्यासाठी, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून तुमच्या बँकेच्या 09223766666 क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. काही वेळातच तुम्हाला बँकेकडून मेसेज येईल.
या मेसेजमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलन्स संबंधित माहिती मिळेल आणि मिनी स्टेटमेंट पाहण्यासाठी तुम्हाला 09223866666 डायल करावा लागेल. लक्षात ठेवा ही सेवा फक्त SBI कडे नोंदणीकृत मोबाईल नंबर असलेल्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
जर तुम्ही तुमच्या खात्यात तुमचा मोबाईल नंबर नोंदवला नसेल, तर तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन तुमचा मोबाईल नंबर नोंदवावा लागेल. यानंतर तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकाल.
एसएमएसद्वारे एसबीआय खात्यातील बॅलेन्स कसा तपासायचा...
बँकेद्वारे दिलेल्या एसएमएस बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवरुन एसएमएस पाठवून SBI खात्यातील बॅलेन्स तपासू शकता.
SBI बॅलेन्स तपासण्यासाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन 09223766666 वर एसएमएस 'BAL' पाठवा. यानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे खात्यातील बॅलेन्सची माहिती मिळेल. ज्यामध्ये तुम्ही 09223866666 वर एसएमएस 'MSTMT' पाठवून नवीनतम व्यवहार म्हणजेच मिनी स्टेटमेंट माहिती मिळवू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.