Gold Investment Vs Share Market Investment: बहुतेक आर्थिक तज्ञ ह गुंतवणूकदारांना जास्त परतावा मिळण्यासाठी शेअऱ मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. मात्र कुणीही सोने किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.
मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०२२-२३ या वर्षात सोने आणि चांदीतून शेअर मार्केटपेक्षा अधिक रिटर्नस् दिले आहेत. Investment Tips in Marathi Gold and Silver will give more return than share market
IILF सिक्युरिटीजच्या डेटानुसार सोन्यातील गुंतवणूकीतून Gold Investment गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २००२ ते मार्च २०२३ या काळात १३.५ टक्के परतावा मिळाला आहे. चर चांदीने याच काळात ९.४५ टक्के परतावा दिला आहे.
या तुलनेत सेंसेक्सने केवळ १.७ टक्के आणि निफ्टीने ०.४० टक्के एवढे रिटर्न दिले आहेत stock market return.यावरूनच शेअर मार्केटपेक्षा सोने आणि चांदीतून Silver अधिक जास्त परतावा मिळाल्याचं सिद्ध झालंय.
सोन्याचे भाव वाढल्याने गेल्या आर्थिक वर्षात Financial Year सोन्यात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळाला आहे. सध्या भारतात सोन्याची किंमत ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या जवळपास पोहचली आहे. २०२२ सालामध्ये सोन्याच्या भावामध्ये ८ हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा फायदा झाला.
तर चांदीची किंमतही ७२ हजार रुपये किलो एवढी वाढली आहे. सोन्या-चांदीच्या दरातील ही तेजी पुढेदेखील कायम राहणार असल्यास सराफ बाजारातील तज्ञांचं म्हणणं आहे. २०२३ या वर्षा अखेरपर्यंत सोन्याचे दर ६५,०००रुपये प्रिती १० ग्रॅम पर्यंत पोहचू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना येत्या काळात देखील चांगला नफा प्राप्त होणार आहे. Investment in gold
शेअर बाजारात गुंतवणूक करणं म्हणजे जोखीम उचलणं असतं. तर दुसरीकडे सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणं हा गुंतवणूकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. शेअर बाजारात तेजी आल्यास सोने आणि चांदीचे दर घसरतात असं म्हंटलं जातं. तर बाजार घसल्यास हे दर वाढतात.
हे देखिल वाचा-
मात्र गेल्या १०-१५ वर्षातील चित्र पाहता. सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामागे जागतिक घडामोडी हे देखील एक कारण आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक केलेल्यांना तोटा सहन करावा लागलेला नाही. शेअर मार्केटच्या तुलनेत सोन्यातील गुंतवणूकीतून दुप्पटहून अधिक परतावा मिळालेला आहे.
शेअर मार्केटच्या तुलनेत दुप्पट रिटर्न
केडिया कमोडिटिजचे प्रेसिंडंट अजय केडिया यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या १५ वर्षांमध्ये सोन्याने शेअर मार्केटच्या तुलनेत दुप्पट रिटर्नस् दिले आहेत. २४ मार्च रोजी असलेल्या सोने, चांदी आणि सेंसेक्सच्या मार्केट बंदच्या भावानुसार केडिया यांनी उदाहरण देत सांगितलं, की १५ वर्षांपूर्वी १० ग्रॅम सोन्याची किंमत ९३९५ रुपये इतकी होती. तर चांदीची किंमत १९५२० रुपये प्रिती किलो एवढी होती. तर सेसेंक्स २०२८५ या स्तरावर होता.
२४ मार्चला सोन्याचे दर हे ५९८०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ७०७५० प्रति किलो एवढी होती. तर सेंसेक्स ५७५५० वर होता. या अर्थाने सोन्याने गेल्या १५ वर्षात ४४८ टक्के परतावा दिला आहे तर चांदीने २४६.५७ टक्के परतावा दिला आहे. तर याच काळात सेंसेक्सने २०२.३८ टक्के रिटर्न दिले आहेत. म्हणजेच सोन्या चांदीतून दुप्पटहून अधिक फायदा झाला आहे.
तर केडिया यांच्या सागण्यानुसार गेल्या पाच वर्षात सोन्यातील गुंतवणूकीतून ८८.३ टक्के, चांदीतून ७८.८५ टक्के आणि सेंसेक्समधून ८०.११ टक्के रिटर्नस् मिळाले आहेत.
कसं असेल नवं आर्थिक वर्ष
अजय केडिया यांच्या मते नव्या आर्थिक वर्षात इक्विटी बाजारात फारशी चांगली उलाढाल पाहायला मिळणार नाही. निवडणूका, कमी महागाई यांसारख्या देशांतर्गत कारणांमुळे इक्विटी मार्केटमध्ये ५ ते ६ टक्क्यांनी वाढ दिसून येऊ शकते.
तर दुसरीकडे ट्रेड वॉर आणि मंदी सारख्या जागतिक समस्यांचा गुंतवणूकदारांच्या मनःस्थितीवर परिणाम होवू शकतो. तर दुसरीकडे येणाऱ्या आर्थिक वर्षातही सोन्यासाठी १०-१२ टक्के आणि चांदीसाठी ३० टक्के परतावा मिळू शकतो.
दागिने खरेदी म्हणजे सोन्यात गुंतवणूक नव्हे
दागिने खरेदी करणं म्हणजे सोन्यात गुंतवणूक करणं असा होत नाही. तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ५ते १० टक्के सोनं असंण गरजेचं आहे. सोन्यातील गुंतवणूक ही डिजीटल गोल्ड, सॉवरिन गोल्ड बॉन्ड तसचं गोल्ड म्युच्युअल फंड आणि गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून केली जाते.
या पर्यायांच्या माध्यमातून तुम्ही चांगला परतावा मिळण्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. How to invest in gold शिवाय शेअर मार्केटच्या गुंत्यामध्ये न पडता चागला परतावा मिळण्यासाठी हा एक सुरक्षित पर्याय असल्याचं म्हणता येईल.
टीप- हा लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.