Investment Tips : शेअर्स, रियल इस्टेट सगळं काही बुडणार, सोन्या-चांदीतच गुंतवणूक करणे ठरेल योग्य; प्रसिद्ध लेखकाचा लाखमोलाचा सल्ला

अमेरिकेसारख्या बलाढ्य अर्थव्यवस्था असलेल्या देशावरसुद्धा कर्जाचा बोझा वाढतच चालला आहे
Investment Tips
Investment Tips esakal
Updated on

Investment Tips :

प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे जास्त पैसे असावेत. आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला कधीच कशाची कमी पडू नये यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करतात. कारण, अडचणीच्यावेळी सगळी सोंग घेतात पण पैशांचे सोंग घेता येत नाही. त्यामुळे पैसे बचत करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.

पण सध्या अनेक स्किम, योजना बँक राबवत आहेत. ज्या ग्राहकांना पैसे गुंतवण्याचा सल्ला देतात. पण, काहीवेळा हे पैसे गुंतवण्यासाठी निवडले गेलेले मार्ग आपल्याला फसवतात.  अनेक लोक आजकाल ट्रेडींग, शेअर मार्केटच्या मागे लागले आहेत.

तसेच, रियल इस्टेट सेक्टरमध्येही गुंतवणूक केली जाते. पण 'Rich Dad Poor Dad' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी यांना काहीतरी वेगळंच सांगायचं आहे.

Investment Tips
Mutual Fund Investment : इक्विटी म्युच्युअल फंडांत मार्चमध्ये घट; दुसऱ्या महिन्यात १९,००० कोटींची गुंतवणूक

रिअल इस्टेट, शेअर मार्केट म्हणजे केवळ एक फुगा आहे. जो कधीही फुटू शकतो, असे रॉबर्ट यांनी म्हटले आहे.  रॉबर्ट यांचा सुरूवातीपासून असाच सल्ला आहे की, लोकांनी सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करावी. कारण तेच चिरंतन आहे. त्याच विश्वासावर त्यांनी हे ट्विट केले आहे.

रॉबर्ट पुढे म्हणतात की, अमेरिकेसारख्या बलाढ्य अर्थव्यवस्था असलेल्या देशावरसुद्धा कर्जाचा बोझा वाढतच चालला आहे. प्रत्येक ९० दिवसाला अमेरिकेवरील कर्ज (US Debt) 1 ट्रिलियन डॉलर इतके वाढत आहे. लवकरच अमेरिकेची दिवाळं निघण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

Investment Tips
Investment Tips : केवळ 22 पैशांच्या शेअरची आश्चर्यजनक कामगिरी, 4 वर्षात 3,000% परतावा...

अशा सगळ्या परिस्थितीत कृपया स्वत:ला वाचवा. तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने, चांदी, बिटकॉईन खरेदी करा. सोप्या भाषेत सांगायचं तर, रॉबर्ट यांनी जगभर पसरलेलं गुंतवणुकीचे जाळे संपुष्टात येणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे.  

बिटकॉइनबद्दल रॉबर्ट लिहीतात की,  कॅथी वुड (प्रसिद्ध अमेरिकन गुंतवणूकदार) म्हणतात की, बिटकॉइन २.३ मिलियनपर्यंत पोहोचेल. कॅथी खूप हुशार आहे आणि मला तिच्या या वाक्यावर पूर्ण विश्वास आहे. तिच्या या वाक्यावर विश्वास ठेऊन मी बिटकॉइन खरेदी वाढवण्याचा विचार करत आहे.

Investment Tips
SIP Investment Plan : फक्त 2000 रुपयांनी सुरु करा एसआयपी, आणि रिटायरमेंटसाठीचा फंड आपोआप होईल तयार...

रॉबर्ट यांनी याआधीही सोने-चांदीतच अधिक गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर चांदीतील गुंतवणूक वाढवा असे त्यांनी सांगितले होते.  गरीब लोकही सहज चांदी खरेदी करू शकतात. त्यामुळे ही एक चांगली संधी आहे, असे त्यांचे म्हणणे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.