डॉ. दिलीप सातभाई
प्राप्तिकर विवरणपत्र भरून दाखल करण्याची वेळ जवळ येत चालली आहे, तसे करदात्यांना कोणता फॉर्म भरायचा, विवरणपत्रातील माहितीत काही बदल झाले आहेत का, कोणती नवी माहिती द्यावी लागणार आहे का, अंतिम तारीख तीच आहे ना... असे एक ना अनेक प्रश्न सतावू लागले आहेत. याबाबत अगदी अद्ययावत आणि अचूक माहिती ‘सकाळ मनी’ गेली दोन वर्षे करदात्यांना देत आहे आणि यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही.