तीन निवडणुकांमधील स्थिती
२०१४ : ता. १६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला सत्ता मिळाली. त्यादिवशी ‘सेन्सेक्स’ २६१ अंशांनी वाढून २४,१२१ अंशांवर गेला होता, तर ‘निफ्टी’ ७९.८५ अंशांनी वाढून ७२०३ अंशांवर बंद झाला होता. त्या दिवशी दिवसभरातील व्यवहारांमध्ये ‘सेन्सेक्स’ने २५,००० अंशांचा महत्त्वाचा टप्पा गाठला होता.
२०१९ : ता. २३ मे २०१९ रोजी नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखालील सरकार बहुमताने विजयी झाले. या दिवशी ‘सेन्सेक्स’ २९८ अंशांनी घसरून ३८,८११ अंशांवर स्थिरावला, तर ‘निफ्टी’ ८०.८५ अंशांनी घसरून ११,६५७ अंशांवर स्थिरावला. या दिवशी दिवसभरात ‘सेन्सेक्स’ने प्रथमच ४० हजारांचा टप्पा गाठला होता, तर ‘निफ्टी’ने त्या दिवशी १२,००० अंशांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला होता.
२०२४ : ता. ४ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपला एकहाती स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे दिसून आल्याने शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ‘सेन्सेक्स’ दिवसअखेर ७२,०७९ या दोन महिन्यांतील नीचांकी पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्यात ६२३४ अंशांची किंवा ८.१५ टक्क्यांची घसरण होऊन ७०,२३४ अंश ही जवळपास पाच महिन्यांच्या नीचांकी पातळी गाठली गेली. ‘निफ्टी’ दिवसभरात १९८२ अंश किंवा ८.५२ टक्क्यांनी घसरून २१,२८१ अंशांवर आला. दिवसअखेर तो ५.९३ टक्क्यांनी घसरून २१,८८४ अंशांवर बंद झाला.