Indigo Airlines: मायक्रोसॉफ्टचा एक घोळ आणि इंडिगो एअरलाईन्सला झाला 5,300 करोड रुपयांचा तोटा

All airlines stopped working due to global outage: फ्लाईट पुन्हा सुरू झाल्या असून त्या पूर्वरतपणे चालू होण्यासाठी काहीसा वेळ जाऊ शकतो. फ्लाईट निघण्यापूर्वी प्रवाशांनी अवश्य एकदा फ्लाईटची स्थिती तपासून घ्यावी अशी सुचना कंपनीने प्रवाशांना दिली आहे.
indigo airlines
indigo airlines sakal
Updated on

Microsoft window outage: फक्त अमेरिकाच नव्हे तर जगभरातील सर्वच देशांना मायक्रोसॉफ्टमधील सर्वच्या समस्येचा सामना करावा लागला आहे. यामध्ये सर्वात जास्त फटका हा विमानसेवांना बसला असून, जगभरातील सर्व विमानसेवा ठप्प पडल्या. ज्यामुळे विमानसेवा कंपनीचे शेअर कोसळले. हेच जर भारताबद्दल सांगायचं म्हटलं तर भारतातील सर्वात मोठी एअरलाईन कंपनी इंडिगोचे देखील शेअर खाली आले आहेत, ज्याचा परिणाम म्हणून कंपनीला 5300 करोड रुपयांचे नुकसान झाले आहे.

वीकेंडमध्ये प्रवाशांना असुविधेचा त्रास होऊ शकतो हे इंडिगोने स्पष्ट केले आहे. जरी फ्लाईट्स पुन्हा चालू झाल्या असल्या तरी त्या पुन्हा रुळावर येण्यासाठी वेळ जाणार आहे. कंपनीने सांगितले की, विमानतळावर जाण्याआधी एकदा वेळापत्रक अवश्य तपासून पहा. जर एखाद्या प्रवाशाची फ्लाईट चुकलीच तर त्याने दुसऱ्या पर्यायी फ्लाईटची सुविधा करावी अन्यथा परतावा घेण्यासाठी अर्ज करावा.

indigo airlines
Budget 2024: कॅप्टन निर्मला सीतारामन यांच्या टीमचे 6 चेहरे कोण आहेत? ज्यांनी तयार केले 2024 बजेट

प्रवाशांनी काळजी घ्यावी ...

कंपनीने सांगितले की, आता विमानसेवा हळूहळु सुरू झाल्या आहेत परंतू विकेंड्सला प्रवाशांना फ्लाईट विलंब यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जाण्याआधी आपल्या फ्लाईटसंबंधीत माहिती अवश्य तपासून पहा. अशी सूचना कंपनीने दिली आहे. यासंबंधित कंपनीने एक लिंक देखील शेअर केली आहे.

कंपनीच्या शेअरमध्ये घसरण...

बीएसई च्या आकडेवारीनुसार शुक्रवारी इंडिगोचे शेअर 3 टक्क्यांवरून खाली कोसळले, तसेच कंपनीच्या शेअर्समध्ये 137.25 रुपयांचा तोटा झाला असून तो 4,278.95 रुपयांवर बंद झाला आहे. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचे शेअर 4,251 रुपयांसोबत खालच्या स्तरावर पोहोचले होते. खरं तर कंपनीचा शेअर हा 4,415 रुपयांवर उघडला गेला होता. कंपनीचा 52 आठवड्याचा उच्चांक हा 4,610 रुपये इतका होता जो 10 जूनला पाहायला मिळालेला.

indigo airlines
Budget 2024: आत्मनिर्भर भारत की सुरक्षित भारत? वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने अर्थसंकल्पापूर्वी उपस्थित केला प्रश्न

5,300 करोड रुपयांचं झालं नुकसान...

शेअर बाजारामध्ये घसरण झाल्यानंतर कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी शेअर बाजार उघडला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप हे 1,70,539.48 करोड रुपये होते तर शुक्रवारी जेव्हा बाजार बंद झाला तेव्हा ते 1,65,239.33 कोटी रुपयांवर आले. याचाच अर्थ की, शुक्रवारी कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 5,300.15 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

काय आहे सरकारचं म्हणणं...

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3 वाजल्यापासून सर्व विमानसेवा ह्या मुळ वेळापत्रकानुसार सुरू होतील. मंत्रालयाने पुढे सांगितले की, आमच्या सर्व विमानसेवा व उड्डानांवर लक्ष असणार असून प्रवाशांना पर्यायी फ्लाईट व रिफंड देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

indigo airlines
Budget 2024 : केंद्र सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला नाही तर काय होईल? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.