भूषण गोडबोले-
दिवाळी म्हणजे आनंद, उत्सव आणि समृद्धीचा सण. भारतीय शेअर बाजारात दिवाळीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘मुहूर्त ट्रेडिंग’. दिवाळीच्या दिवशी, शेअर बाजार काही तासांसाठी उघडतो आणि गुंतवणूकदार मुहूर्ताच्या वेळेत शेअर बाजारात गुंतवणूक करतात. या आठवड्यात शुक्रवार (ता. १ नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजता लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर शेअर बाजारात साधारण तासभराचे विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्र होणार आहे. या निमित्ताने हिंदू नववर्ष अर्थात विक्रम संवत २०८१ चे स्वागत बाजाराकडून केले जाईल, अशा वेळेस गुंतवणूकदारांनी कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी, ते जाणून घेऊ या.