सुधाकर कुलकर्णी
निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाबाबतच्या वाढत्या जागरूकतेमुळे नॅशनल पेन्शन सिस्टिम अर्थात ‘एनपीएस’ योजनेतील लोकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत चालला आहे व अधिकाधिक लोकांनी या योजनेत सहभागी व्हावे म्हणून ‘पीएफआरडीए’ (पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी) यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या योजनेत वेळोवेळी बदल करून लवचिकता आणली जात आहे. याचाच एक भाग म्हणून ‘एनपीएस’मधील योगदान सहजगत्या करता यावे यासाठी ‘बीबीपीएस’च्या (भारत बिल पेमेंट सिस्टिम) माध्यमातून पेमेंट सुविधा सुरू केली आहे. यामुळे ‘एनपीएस’मधील एकरकमी; तसेच नियमित (एसआयपी) पेमेंट आता विनासायास करता येणार आहे.