नंदिनी वैद्य
‘एनटीपीसी’ची उपकंपनी आणि सरकारी ‘महारत्न कंपनी’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या एनटीपीसी ग्रीन एनर्जी कंपनीचा ‘आयपीओ’ १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान प्राथमिक बाजारात विक्रीसाठी येत आहे. तब्बल रु. १०,००० कोटींचा ‘एलआयसी’नंतरचा हा मोठा सरकारी ‘आयपीओ’ असून, त्यासाठीचा किंमतपट्टा रु. १०२ ते रु.१०८ प्रतिशेअर आहे.