Remittances: परदेशी भारतीयांचा मायदेशी पैसे पाठवण्याचा नवा विक्रम, 'या' देशातून आला सर्वाधिक पैसा

Overseas Indians: अहवालात म्हटले आहे की, 1991 पासूनच्या डेटाचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळून आले आहे की, कोणत्याही एका तिमाहीत परदेशातून पाठवलेला हा सर्वात मोठा आकडा आहे.
Remittances From Overseas Indians
Remittances From Overseas IndiansEsakal
Updated on

A new record of remittances by Indians living abroad:

परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी मायदेशी पैसे पाठवण्याचा नवा विक्रम केला आहे. आकडेवारीनुसार, परदेशी भारतीयांनी रेमिटन्सद्वारे डिसेंबर तिमाहीत 29 अब्ज डॉलर्स पाठवले आहेत.

रिझर्व्ह बँकेने प्रकाशित केलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, डिसेंबर 2023 ला संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ इनवर्ड रेमिटन्स 29 अब्ज डॉलर्स होते. त्याची आकडेवारी खाजगी हस्तांतरण श्रेणीमध्ये देयकांच्या शिल्लक चालू खात्यात नोंदवली जाते. देशांतर्गत अर्थव्यवस्थेसाठी परदेशातून पैसे येणे खूप फायदेशीर मानले जाते.

परदेशातील रेमिटन्स एनआरआय ठेवींपेक्षा वेगळे असतात. यामध्ये अशा पैशांची नोंद ठेवली जाते, जी अन्य देशात राहणारे भारतीय तो पैसा परत भारतात पाठवतात. यामुळे देशाची चालू खात्यातील तूट कमी होण्यास मदत होते.

डिसेंबर तिमाहीत परदेशातून पाठवल्या जाणाऱ्या वाढीव पैशाचे मुख्य कारण म्हणजे FCNR (फॉरेन करेंसी-नॉन रेजिडेंट) मध्ये सतत वाढत असलेला परतावा. FCNR मधील परताव्यातील वाढ परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी ठेव अधिक आकर्षक बनवते.

Remittances From Overseas Indians
GST Collection: मार्चमध्ये झाले दुसरे सर्वात मोठे जीएसटी संकलन; 2023-24चे उत्पन्न 1.78 लाख कोटींच्या पुढे

एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, डिसेंबर तिमाहीत प्राप्त झालेल्या 29 अब्ज डॉलर्सचा आकडा आतापर्यंतच्या कोणत्याही तिमाहीत परदेशातून पाठवलेल्या रकमेपैंकी सर्वाधिक आहे.

अहवालात म्हटले आहे की, 1991 पासूनच्या डेटाचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळून आले आहे की, कोणत्याही एका तिमाहीत परदेशातून पाठवलेला हा सर्वात मोठा आकडा आहे.

Remittances From Overseas Indians
Share Market Today: आज शेअर बाजारात कोणत्या शेअर्समध्ये होईल वाढ? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

रेमिटन्स बाबतीत भारत वर्षानुवर्षे आघाडीवर आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये भारतात परदेशातून पाठवलेल्या रकमेतून 100 अब्ज डॉलर्सहून अधिक रक्कम प्राप्त होईल.

सध्या भारताला परदेशातून पाठवल्या जाणाऱ्या रकमेत सर्वाधिक योगदान अमेरिकेतून येत आहे. कोविडनंतर, अमेरिकेत राहणारे भारतीय सतत जास्त पैसे पाठवत असताना, आखाती देशांमधून पाठवण्याचे प्रमाण कमी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.